Donald Trump Visit: डोनाल्ड ट्रम्प आज घेणार महत्त्वाच्या उद्योजकांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 01:21 AM2020-02-25T01:21:33+5:302020-02-25T02:24:12+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोमवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात कोणताही व्यापारविषयक मोठा करार होण्याची शक्यता नाही
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोमवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात कोणताही व्यापारविषयक मोठा करार होण्याची शक्यता नसली तरी ते उद्या, मंगळवारी दिल्लीमध्ये भारतीय उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.
भारतीय उद्योजकांनी अमेरिकेत गुंतवणूक करावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे भारतातील महत्त्वाच्या उद्योजकांना भेटून ते त्यांना तसे आवाहन करणार आहेत, असे सांगण्यात आले. मुकेश अंबानी, टाटा सन्सचे एन. चंद्रशेखरन, भारती एअरटेलचे सुनील मित्तल, लार्सन अँड टुब्रोचे ए. एम. नाईक, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बायकॉनच्या किरण मझुमदार शॉ यांच्यासह आणखी काही उद्योजकांशी ते चर्चा करणार आहेत. भारतातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांची अमेरिकेत मोठी गुंतवणूक आहे.