Donald Trump Visit: सचिन ते विराट अन् शोले ते डीडीएलजे; ट्रम्प यांची 'मोटेरा'वर 'बॅटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:25 PM2020-02-24T15:25:35+5:302020-02-24T15:31:51+5:30
Donald Trump Visit: आज तुम्ही जे प्रेम आणि आदरातिथ्य दाखवले ते आमच्या मनात कायम राहील.
अहमदाबाद - भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुपारी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील विविधतेत एकतेचा उल्लेख केला. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली या क्रिकेटपटूंसह बॉलिवूड आणि शोले, डीडीएलजे या सुप्रसिद्ध चित्रपटांचा उल्लेख करून उपस्थितांची मने जिंकली.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आज तुम्ही जे प्रेम आणि आदरातिथ्य दाखवले ते आमच्या मनात कायम राहील. हे मोटेरा स्टेडियम खूप सुंदर आहे. येथील बॉलिवूडची जगभरात ओळख आहे. तसेच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि शोलेसारख्या चित्रपटांचा आस्वाद जगभरातील अनेक लोकांनी घेतला आहे.''असे ट्रम्प यांनी सांगितले.
US President Donald Trump: All over the planet people take great joy in watching Bollywood films, bhangra, and classic films like DDLJ and Sholay. You cheer on great cricketers like Sachin Tendulkar and Virat Kohli pic.twitter.com/CHvedzlXQh
— ANI (@ANI) February 24, 2020
''काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोदी ह्युस्टन येथे आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत हाऊडी मोदी कार्यक्रमात फुटबॉल स्डेडियमवर करण्यात आले होते. आज जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्डेडियम असलेल्या मोटेरावर माझे स्वागत करण्यात आले. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंची ओळख जगभरात आहे.'' असे ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात दिवाळी आणि होळी या सणांचाही उल्लेख केला. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच भारतातील विविधतेमधील एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
Donald Trump Visit: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भाषणात पाकिस्तानचा उल्लेख करतात तेव्हा...
मोदी-ट्रम्प 'झप्पी'नंतर Memesची 'थप्पी', ही पाहा 'इक्कीस फोटो की सलामी'!
Donald Trump's Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्सनल लाइफमधील या गोष्टींबाबत भारतीय गुगलवर करताहेत सर्च
Donald Trump ज्या सूटमध्ये राहणार तो पाहायचाय?; एका रात्रीची भाडं 'फक्त'....
तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्य यांचे भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचाराला फाटा देत ट्रम्प यांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तिन्ही दलांच्या जवानांनी ट्रम्प यांना मानवंदना दिली. तसेच विविध राज्यातील सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांमधून ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली.