मौल्यवान हिऱ्यावर कोरला डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा; गुजरातच्या व्यापाऱ्याने बनवला अनोखा हिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 21:37 IST2025-01-20T21:36:09+5:302025-01-20T21:37:09+5:30

Donald Trump : सूरतच्या हिरे व्यापाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांना भेट देण्यासाठी अनोका हिरा तयार केला आहे.

Donald Trump's face engraved on a precious diamond; Gujarat businessman creates unique diamond | मौल्यवान हिऱ्यावर कोरला डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा; गुजरातच्या व्यापाऱ्याने बनवला अनोखा हिरा

मौल्यवान हिऱ्यावर कोरला डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा; गुजरातच्या व्यापाऱ्याने बनवला अनोखा हिरा

Donald Trump : अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी पार पडत आहे. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेक पाहुणे वॉशिंग्टन डीसीला पोहोचले आहेत. दरम्यान, गुजरातमधील हिरे व्यापाऱ्याने ट्रम्प यांच्यासाठी एक मौल्यवान भेट तयार केली आहे. या व्यापाऱ्याने चक्क 4.7 कॅरेटच्या हिऱ्यावर ट्रम्प यांची प्रतिकृती बनवली आहे. लवकरच ते ट्रम्प यांना हा मौल्यवान हिरा भेट देणार आहेत. 

कोणी तयार केला अनोखा हिरा ?
गुजरातचे हिरे व्यापारी मुकेश पटेल आणि स्मित पटेल यांच्या कंपनीने हा अनोखा हिरा तयार केला आहे. या 4.7 कॅरेटच्या लॅबग्रोन हिऱ्यावर अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र कोरले आहे. हिऱ्याला ट्रम्प यांच्या चेहऱ्याचा आकार देण्यात आला आहे. हिऱ्यावर चेहरा कोरणे खूप कठीण आणि आव्हानात्मक काम होते. कंपनीच्या 5 कारागिरांनी हा एक हिरा कोरण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि सुमारे 60 दिवसांनंतर हा हिरा तयार झाला. 

व्हिडिओ पहा-

हिऱ्याची किंमत किती आहे?
सध्या या हिऱ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 10 हजार अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच भारतीय 8.5 लाख भारतीय रुपये आहे. हा हिरा केवळ सुरतच्या प्रतिभेलाच प्रतिबिंबित करत नाही तर भारतीय कला आणि तंत्रज्ञानाचा एक नमुना आहे. या हिऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हिरे व्यापारी पीएम मोदींच्या निकटवर्तीय
ग्रीनलॅब डायमंडचे मालक मुकेश भाई पटेल हे पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरा भेट दिला होता. त्या हिऱ्याची किंमत सुमारे 20 हजार अमेरिकन डॉलर्स होती.

Web Title: Donald Trump's face engraved on a precious diamond; Gujarat businessman creates unique diamond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.