Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्यासाठी 'ढोकळा', तर मोदींसाठी 'स्पेशल चहा', महामेजवानीमध्ये असणार 'हे' खास पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:48 PM2020-02-24T12:48:46+5:302020-02-24T12:50:08+5:30
Special Menu For Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास पारंपरिक खाद्यपदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे.
अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जादू की झप्पी देत नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं आहे. अहमदाबादमध्ये होणारा मोदी व ट्रम्प यांचा रोड शो व त्यानंतर मोटेरा स्टेडियममध्ये होणारा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम दृश्य स्वरूपातील मुख्य आकर्षण असणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास पारंपरिक खाद्यपदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. खमन ढोकळा, कॉर्न समोसा यासह काही खास पदार्थ ट्रम्प यांच्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तर पंतप्रधान मोदींसाठी स्पेशल मसाला चहा तयार करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प दाम्पत्य साबरमती आश्रमाला भेट देईल तेव्हा त्यांचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत खमन ढोकळा, गुजरातचा प्रसिद्ध आल्याचा चहा, ब्रोकली आणि मक्याचा समोसा, अनेक धान्यांपासून बनवलेली बिस्किटे, आईस टी (चहा) व ग्रीन टी देऊन केले जाईल.
शेफ सुरेश खन्ना हे सर्व पदार्थ बनवणार आहेत. हे सगळे पदार्थ पूर्णपणे शाकाहारी असून ते गुजराती पद्धतीने बनवले जातील. आधी अन्न निरीक्षक या पदार्थांची चव घेऊन मगच ते पाहुण्यांना दिले जातील. दिल्लीत ट्रम्प यांचा मुक्काम ज्या हॉटेलात असणार आहे तेथील शेफला पाहुण्यांची आवड-निवड आधीच कळविण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यात प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष ठेवले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ट्रम्प सोन्याच्या ताटात जेवणार; चांदीच्या कपात चहा पिणार
ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या ताटात मिष्टान्नाचा आस्वाद घेणार आहेत. यात ते नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण करणार आहेत. याशिवाय सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या टी-सेटमध्ये ट्रम्प यांना चहा दिला जाणार आहे. जयपूरचे प्रसिद्ध डिझायनर अरुण पाबूवाल यांनी ट्रम्प कुटुंबियांच्या वापरासाठी खास कटलरी व टेबल वेअर डिझाईन तयार केले आहे. त्या प्लेटस् दिल्लीला पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय गोल्ड प्लेटेड नॅपकिन सेटही तयार करण्यात आला आहे.
Donald Trump India Visit Live : वेलकम टू इंडिया... डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींची 'जादू की झप्पी' https://t.co/7f2na7sSdn
— Lokmat (@MiLOKMAT) February 24, 2020
अरुण पाबूवाल यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी गोल्ड प्लेट तयार केलेल्या आहेत. बराक ओबामा यांच्यासह दोन राष्ट्राध्यक्षांसाठी टेबलवेअर डिझाईन तयार केलेले आहे. याशिवाय मेटल डिझायनर पाबूवाल यांनी क्रिकेट वर्ल्ड कपपासून विश्वस्तरीय सौंदर्य स्पर्धांसाठीही ट्रॉफी व मुकुट तयार केलेले आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण 36 तासांच्या भारत दौऱ्यात मात्र या अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ जेमतेम तीन तासांचा आहे. यापैकी मंगळवारी दुपारी दिल्लीत डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे दीड तास अधिकृत भेट व चर्चा होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन #DonaldTrumpIndiaVisithttps://t.co/ZQvUacF9Na
— Lokmat (@MiLOKMAT) February 24, 2020
डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतात येत असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले तेव्हा व तीन वेळा अन्य निमित्ताने दोघांची भेट झालेली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रॅपो’ हे या दौ-याच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती सुरक्षेचं कवच; युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर... #DonaldTrumpIndiaVisithttps://t.co/gpsB2Dvhew
— Lokmat (@MiLOKMAT) February 24, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Donald Trump India Visit Live : वेलकम टू इंडिया... डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींची 'जादू की झप्पी'
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन
ट्रम्प यांचं फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही भारी विमान, याच्या भन्नाट गोष्टी वाचून व्हाल हैराण!
...तर डोनाल्ड ट्रम्प कुटुंबाने रांगेत उभं राहून शिवथाळीची चव चाखली असती!
मोदी सरकार असेपर्यंत समाधान नाही, काश्मीरबाबत इम्रान खान हतबल