Donald Trump's India Visit : अन् साबरमती आश्रमात मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिले सूतकताईचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:58 PM2020-02-24T12:58:14+5:302020-02-24T13:06:24+5:30
Donald Trump's India Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली.
अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात अहमदाबाद येथे आगमन झाले आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली.
#WATCH US President Donald Trump and First Lady Melania Trump spin the Charkha at Sabarmati Ashram. PM Modi also present. #TrumpInIndiapic.twitter.com/TdmCwzU203
— ANI (@ANI) February 24, 2020
साबरमती आश्रमामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांचे सूती शाल घालून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोदींनी आश्रमाची माहिती दिली. यावेळी मोदींनी ट्रम्प यांना चरख्याबाबत माहिती दिली. त्यानंतर ट्रम्प यांनी चरख्यावर सूतकताई कशी करतात हे जाणून घेत स्वत: चरखा चालवला.
US President Donald Trump and First Lady Melania Trump spin the Charkha at Sabarmati Ashram. PM Modi also present. pic.twitter.com/tn43byfBDB
— ANI (@ANI) February 24, 2020
तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्य यांचे भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचाराला फाटा देत ट्रम्प यांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तिन्ही दलांच्या जवानांनी ट्रम्प यांना मानवंदना दिली. तसेच विविध राज्यातील सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांमधून ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण 36 तासांच्या भारत दौऱ्यात अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ जेमतेम तीन तासांचा आहे. यापैकी मंगळवारी दुपारी दिल्लीत डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे दीड तास अधिकृत भेट व चर्चा होईल. डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतात येत असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले तेव्हा व तीन वेळा अन्य निमित्ताने दोघांची भेट झालेली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रॅपो’ हे या दौ-याच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता.