अज्ञात नंबरवरून आलेला कॉल घेऊ नका, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:42 AM2023-06-03T07:42:53+5:302023-06-03T07:43:11+5:30
वाढत्या तंत्रज्ञानाबरोबरच सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत असल्याचं वैष्णव यांचं वक्तव्य.
संजय शर्मा
नवी दिल्ली : अनोळखी नंबरवरून आलेला कॉल घेऊ नका, असे आवाहन केंद्रीय दळणवळण, आयटी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील सर्व नागरिकांना शुक्रवारी केले. भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, वाढत्या तंत्रज्ञानाबरोबरच सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाच्या आगमनाने सायबर गुन्हे करणाऱ्यांच्या हातात मोठे हत्यार आले आहे. मोबाइल सीमची कॉपी होत आहे. सायबर गुन्ह्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांची खाती काही सेकंदात रिकामी होत आहेत.