झाकीर नाईकला मालदीवमध्ये प्रवेश नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 10:33 PM2019-12-13T22:33:06+5:302019-12-13T22:33:42+5:30
मालदीवचे खासदार मोहम्मद नशीद यांनी आज राजधानी दिल्लीत ही माहिती दिली.
नवी दिल्ली - चिथावणीखोर भाषणं देणारा वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकला (५३) मालदीवमध्ये प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. नाईकने मालदीवला जाण्यासाठी तिथल्या सरकारकडे अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. झाकीर नाईक यांनी नुकतीच मलेशियाहून मालदीव ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र मलेशियन परवानगी दिली नाही, असे मालदीवचे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशिद यांनी शुक्रवारी सांगितले. मालदीवचे खासदार मोहम्मद नशीद यांनी आज राजधानी दिल्लीत ही माहिती दिली.
झाकीर नाईक याला मालदीवला जायचे होते. मात्र, आम्ही त्याला मालदीवमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे, असे नशीद यांनी सांगितलं. दरम्यान, नशीद हे भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सप्टेंबरमध्ये रशियात आर्थिक प्रश्नावर एक परिषद भरवण्यात आली होती. त्यावेळी मोदींनी मलेशियाचे पंतप्रधान डॉ. मोहम्मद महातीर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरही चर्चा करण्यात आली होती. मोदींनी नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा महातीर यांच्याकडे उपस्थित देखील केला होता. यावेळी दोन्ही देशाचे अधिकारी या विषयावर एकमेकांच्या संपर्कात राहून त्यावर निर्णय घेणार असल्याचं ठरलं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी त्यावेळी सांगितलं होतं. तसेच झाकीर नाईक याच्या कृतीमुळे देशहिताला बाधा येत असल्यास त्याला दिलेले कायमस्वरूपी नागरिकत्व वेळप्रसंगी रद्दही करू, असा इशारा मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महातीर मोहम्मद यांनी दिला होता.
Contrary to his wish, Zakir Naik was not allowed to come to Maldives, says Maldivian Parliament's Speaker
— ANI Digital (@ani_digital) December 13, 2019
Read @ANI Story | https://t.co/reCePG7w9epic.twitter.com/JFmHN3nLlu