आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 10:34 AM2019-10-08T10:34:01+5:302019-10-08T10:34:42+5:30

देश मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडेल; भागवत यांना विश्वास

Dont talk too much about the economic downturn says rss chief mohan bhagwat | आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला

आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला

Next

नागपूर: आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वसामान्यांना दिला आहे. मंदीची फार चर्चा झाल्यास व्यापारी, व्यावसायिक बचावात्मक पवित्रा घेतील. त्यामुळे ते फारशी गुंतवणूक करणार नाहीत. याचा परिणाम पुन्हा अर्थव्यवस्थेवर होईल असं भागवत म्हणाले. सरकार अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी प्रयत्न करत असून देश लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या देशाचा जीडीपी अवघ्या ५ टक्क्यांवर आला आहे. जीडीपी मोजण्याचे मानक दोषपूर्ण असल्याचं भागवत म्हणाले. 

जगातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक स्पर्धेचा फटका भारताला बसतो आहे. विकास दर शून्याच्या खाली गेला, तर मंदी आली असे म्हणतात. शासनाने या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी दीड महिन्यात अनेक पावले उचलली आहेत. या मंदीच्या चक्रातून देश निश्चित बाहेर येईल, असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला. अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यासाठी सरकारला भूमिका घ्यावी लागली. सरकारची लोककल्याणकारी धोरणं व उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत प्रभावी पद्धतीनं पोहोचावेत, यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जगातील प्रचलित मानक अनेक आर्थिक प्रश्नांचा उलगडा करत नाहीत. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला देशाच्या मूळांमध्ये जावे लागेल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच पर्यटन यावर भर द्यावा. उपलब्ध स्त्रोत व जनतेचा विचार करुन आर्थिक धोरणं तयार करायला हवीत. स्वदेशीचं विस्मरण झाल्यास त्यानं देशाचीच हानी होईल, असंही सरसंघचालकांनी म्हटलं. 

Web Title: Dont talk too much about the economic downturn says rss chief mohan bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.