'झांसी की रानी' कविता लिहीणाऱ्या सुभद्रा कुमारी चौहान यांचे गूगलने बनवले डूडल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 10:45 AM2021-08-16T10:45:46+5:302021-08-16T10:49:03+5:30
Subhadra Kumari Chauhan's Google Doodle:16 ऑगस्ट 1904 ला हिंदीतील लोकप्रिय कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म झाला होता.
नवी दिल्ली : 'झांसी की रानी' या कवितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी झाला. सुभद्रा कुमारी चौहान यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त गुगलने सुभद्रा कुमारी चौहान यांच्या नावाचे डूडल बनवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सुभद्रा कुमारी चौहान यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या महिला सत्याग्रही म्हणूनही ओळखले जाते. हे गुगलडूडल न्यूझीलंडच्या कलाकार प्रभा मल्ल्या यांनी तयार केले आहे. सुभद्रा कुमारी चौहान त्यांनी लिहीलेल्या 'झांसी की रानी' या कवितेसाठी ओळखल्या जातात. वीर रसाने भरलेली आणि काही ओळींमध्ये झाशीच्या राणीचे जीवन मांडणरी ही कविता आजही लोकप्रिय आहे.
बॉलिवूडमध्ये 'झांसी की रानी'
सुभद्रा कुमारी चौहान यांनी ज्या पद्धतीने झांसीची राणी लक्ष्मीबाई यांचे वर्णण आपल्या कवितेतून केलं आहे, त्याच प्रमाणे बॉलिवूडमध्येही झाशीच्या राणीवर चित्रपट बवण्यात आले आहेत. 1953 मध्ये पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत झाशीच्या राणीवर चित्रपट बनवण्यात आला होता. दिग्दर्शक सोहराब मोदींनी हा चित्रपट तयार केला होता. त्यांच्या पत्नी मेहताब यांनी झासीच्या राणीचे पात्र साकारले होते. त्यानंतर, 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'मणिकर्णिका' चित्रपटात कंगना राणावतने झाशीच्या राणीची भूमिका साकारली होती. याशिवाय, टीव्ही सीरियल्समध्ये सुद्धा अनेक वेळा झाशीची राणी दाखवण्यात आली आहेत.