रामपूरमध्ये दून एक्सप्रेस उलटण्याचा प्रयत्न; रेल्वे ट्रॅकवर आढळला लोखंडी खांब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:53 PM2024-09-19T17:53:07+5:302024-09-19T17:53:18+5:30

रामपूरमध्ये दून एक्सप्रेस उलटण्याचा प्रयत्न; रेल्वे ट्रॅकवर आढळला लोखंडी खांब

Doon Express derailment attempt in Rampur; An iron pillar found on a railway track | रामपूरमध्ये दून एक्सप्रेस उलटण्याचा प्रयत्न; रेल्वे ट्रॅकवर आढळला लोखंडी खांब

रामपूरमध्ये दून एक्सप्रेस उलटण्याचा प्रयत्न; रेल्वे ट्रॅकवर आढळला लोखंडी खांब

UP Train Accident : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा ट्रेन उलटण्याचा प्रयत्न झाला आहे. कानपूर, गाझीपूर, देवरियानंतर आता रामपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. उत्तराखंड सीमेला लागून असलेल्या कॉलनीच्या मागून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर लांब लोखंडी पोल ठेवण्यात आला होता. तेवढ्यात डेहराडून (दून) एक्सप्रेस तिथून जात होती. रेल्वे रुळावरील खांब पाहून रेल्वेच्या लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला.

दरम्यान, रेल्वे रुळावर खांब टाकल्याची माहिती मिळताच जीआरपी आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी ट्रॅकवरुन खांब हटवला, त्यानंतर ट्रेन पुढे निघाली. ही घटना काल बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. बळवंत एन्क्लेव्ह कॉलनीच्या मागून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर टेलिकॉमचा जुना 7 मीटर लांबीचा लोखंडी पोल ठेवण्यात आला होता. 

या घटनेची माहिती डेहराडून एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटने स्टेशन मास्टर आणि जीआरपीला दिली. माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. काही वेळाने रामपूरचे एसपीही जिल्हा पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली. पथकाने खांब ताब्यात घेऊन रात्रीच शोधाशोध सुरू केली. गुरुवारी सकाळी पुन्हा अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच आसपासच्या लोकांकडून माहिती घेतली. 

Web Title: Doon Express derailment attempt in Rampur; An iron pillar found on a railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.