नवरीच्या दारात एकाच वेळी दोन वरात
By Admin | Published: June 7, 2017 01:59 PM2017-06-07T13:59:31+5:302017-06-07T14:36:05+5:30
तनु वेड्स मनु या चित्रपटातील प्रसंग एका नवरीमुलीच्या जिवनात घडला आहे. त्यामुळे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - कंगना रानौत, आर. माधवन आणि जिमी शेरगील यांच्या अभिनयाने नटलेला तनु वेड्स मनुचे कथानक तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटाच्या शेवटी कंगनाशी लग्न करण्यासाठी आर. माधवन आणि जिमी शेरगील दोघेही वरात घेऊन येतात. हा प्रसंग तुम्हाला चांगलाच आठवत असेल. चित्रपटातील हाच प्रसंग एका नवरीच्या जिवनात घडला आहे. उत्तरप्रदेशमध्ये असलेल्या हमीरपूर जवळील मौदहा येथे लग्नाच्या ठिकाणी दोन वराती आल्यामुळे मंडपात गोंधळ निर्माण झाला.
मौदहा जवळ अशलेल्या मकरांवर गावात ही घटना घडली आहे. लग्नाच्या ठिकाणी दोन वराती येणार हे समजल्यावर नवरी मुलीच्या घरी गोंधळ झाला. त्यांना काही समज नव्हते मंडपातील सर्वजण द्विधा मन:स्थितीत होते. मुलीचे पहिल्यादा ठरलेले लग्न रद्द झाल्यानंतर दुसऱ्याशी लग्न ठरले होते. ज्या मुलाशी लग्न मोडले होते तो लग्नामध्ये वरात घेऊन आला. लग्न मोडल्यानंतरही त्याला त्या मुलीशीच लग्न करायचे होते. त्याने वरात घेऊन येण्याची धमकी दिली आणि तो मुलगा वरात घेऊनही आला त्यामुळे हा सर्व प्रसंग निर्माण झाला. हा सर्व प्रसंग पाहून नवरी मुलीच्या वडीलांनी पोलिस स्टेशनचा सहारा घेतला आणि सरळ पोलिसांत तक्रार दाखल केली.
मकरांव गांवातील व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न सुमेरपुरातील भानुप्रताप सिंहशी ठरवले होते. साखरपुडा झाल्यानंतर 2 जून रोजी लग्नाची तारीख ठरली होती. पण काही कारणास्तव दोन्हीकडील संबंध बिघडले. आणि लग्नाच्या काही दिवस आधी नवरीमुलीच्या वडिलांनी आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी देणार नाही. हे लग्न आम्हाला मान्य नाही म्हणत. नकार कळवला होता. नवरीमुलीकडून नकार आल्यानंतर भानुप्रताप सिंग आणि त्यांच्या कुटुंबातील भडकले आणि थेट वाद घातला. यावेळी आपण लग्नाच्या ठरवलेल्या वेळेवर वरात घेऊन येणार असे सांगतले. त्या दरम्यान मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न महोबातील भगवान सिंह याच्याशी ठरवले होते.