मागण्यांसाठी कोर्टाचे दरवाजे सदैव खुले आहेत; शेतकऱ्यांना उद्देशून सुप्रीम कोर्टाचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:19 IST2024-12-19T11:19:22+5:302024-12-19T11:19:38+5:30
सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

मागण्यांसाठी कोर्टाचे दरवाजे सदैव खुले आहेत; शेतकऱ्यांना उद्देशून सुप्रीम कोर्टाचे उद्गार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मागण्या, सूचनांसाठी न्यायालयाचे दरवाजे सदैव उघडे आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांना सांगितले. या शेतकऱ्यांनी उच्चस्तरीय समितीशी चर्चा करण्यास नकार दिल्याची माहिती पंजाब सरकारने न्यायालयाला दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले.
खनौरी येथील सीमेवर बेमुदत उपोषण करत असलेले शेतकरी नेते जगजितसिंह डल्लेवाल यांच्याशी सरकारी अधिकाऱ्यांनी काही बैठका घेतल्या होत्या, अशीही माहिती पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बुधवारी दिली.
उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना उच्चस्तरीय समितीने १७ डिसेंबर रोजी चर्चेसाठी बोलाविले; पण शेतकऱ्यांनी त्याला काही प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत, न्या. उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाला दिली होती.
विष घेतलेला शेतकरी उपचारादरम्यान दगावला
आंदोलनादरम्यान विषारी पदार्थांचे सेवन करून आत्महत्या करण्याचा एका शेतकऱ्याने १४ डिसेंबर रोजी प्रयत्न केला होता. त्याचे उपचारादरम्यान बुधवारी निधन आले. त्याला दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले होते.