डुबेरे विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश

By admin | Published: October 30, 2016 10:47 PM2016-10-30T22:47:01+5:302016-10-30T22:47:01+5:30

Doubare school grounds success | डुबेरे विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश

डुबेरे विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश

Next
>
सिन्नर : तालुक्यातल्या डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्र्यांनी विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश मिळवले.
नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अश्विनी वारुंगसे हिने ३ हजार मीटर चालण्याचा स्पर्धेत प्रथम, मयुरी पंढरीनाथ जगधने हिने ३ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय तर अर्चना शिवाजी शिंदे हिने चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. विभागीय शालेय थांगता क्रीडा स्पर्धेत १९ वर्ष वयोगटात सचिन वाळीबा सदगीर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तेजस शिवाजी शिंदे याने १९ वर्ष वयोगटात तलवारबाजी (थांगता) प्रकारात विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना क्रीडा शिक्षक जे. पी. खैरनार, एस. व्ही. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रघुनाथ वारुंगसे, नारायण वाजे, काशिनाथ वाजे, शरद माळी, मुख्याध्यापक एस. सी. रहाटळ, पर्यवेक्षक आर. डी. वाजे, इ. ए. खैरनार, पी. आर. करपे, श्रीमती आर. डी. खंडीझोड, श्रीमती आर. बी. बोडके, श्रीमती एन. बी. खुळे, एन. पी. माळी, बी. व्ही. कडलग आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Doubare school grounds success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.