डबल कॉलम न्यूज़...जोड़...२
By admin | Published: August 23, 2015 08:40 PM2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30
फोटो...
Next
फ टो...महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळातर्फे पंतप्रधानांना निवेदन नागपूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील धोबी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा, अशा मागणीसह महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात प्रदेश मुख्य संघटक संजय भिलकर, मनीष वानखेडे, रमेश काळे, नितीन रामटेककर, राजू भाजीपाले, मनोज कापसे, दीपक सौदागार, भीमलाल दुधमोगरे, राजेश वाघमारे यांचा समावेश होता. निवेदनातून धोबी समाजाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय अशा तिन्ही क्षेत्रात शोषण होत असल्याचा उल्लेख करण्यात आला. शासनाने या समाजाला एससी व ओबीसी अशा दोन प्रवर्गात विभाजित करू न या समाजाशी खेळ केला आहे. विशेष म्हणजे, देशातील सुमारे १७ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशामध्ये या समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश आहे. शिवाय महाराष्ट्रासह ११ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेशात ओबीसीमध्ये समावेश करण्यात आला आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. ....फोटो...मैत्री परिवारातर्फे गडचिरोली जिल्ह्यात औषधी वाटप नागपूर : मैत्री परिवार व डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीतर्फे गडचिरोली जिल्ह्यात औषधी वाटप करण्यात आले. या कार्याचा अलीकडेच रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार भवन येथे शुभारंभ करण्यात आला. संघ प्रचारक व समितीचे कार्यवाह वसंतराव थोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे, या उपक्रमास लागणाऱ्या दरमाही औषधांची संपूर्ण व्यवस्था मैत्री परिवार संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. कमीतकमी एक वर्ष ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आलापल्ली, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा व अहेरीसारख्या दुर्गम भागातील एक हजारापेक्षा अधिक रुग्णांना महिनाभर या औषधांचा लाभ होणार आहे. या उपक्रमाचे अध्यक्ष डॉ. सचितानंद मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हे सेवाभावी कार्य राबविले जात आहे. डॉ. हेडगेवार भवनातील कार्यक्रमाला डॉ. वसंतराव थोटे यांच्यासह हेडगेवार सेवा समितीचे प्रसाद माहनकर, मैत्री परिवाराचे संजय भेंडे, प्रमोद पेंडके, डॉ. पिनाक दंदे, विष्णू मनोहर व अशोक जैन उपस्थित होते. .....