‘डबल इंजिन’ सरकारने जिंकला जनतेचा विश्वास; लोकसभा अन् राष्ट्रपती निवडणुकीचा मार्ग झाला सोपा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:57 AM2022-03-11T11:57:33+5:302022-03-11T11:57:49+5:30

योगींनी बदलले राजकारण. योगींनी एकीकडे लोकांच्या मनात आपला दमदार विश्वास निर्माण केला व दुसरीकडे सरकारी योजना अशा प्रकारे लागू केल्या की, लोकांना थेट फायदा झाला.

‘Double Engine’ government wins public trust; The path to Lok Sabha and Presidential elections has become easier | ‘डबल इंजिन’ सरकारने जिंकला जनतेचा विश्वास; लोकसभा अन् राष्ट्रपती निवडणुकीचा मार्ग झाला सोपा

‘डबल इंजिन’ सरकारने जिंकला जनतेचा विश्वास; लोकसभा अन् राष्ट्रपती निवडणुकीचा मार्ग झाला सोपा

googlenewsNext

- नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळवित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपने आणखी एक इतिहास रचला आहे. देशातील सर्वांत मोठ्या राज्यातील जनतेने सुमारे ३७ वर्षांनंतर एखाद्या पक्षाला सत्तेत पुनरागमनाची संधी देऊन बहुमत दिले आहे. यामुळे देशभरात मुख्यमंत्री योगी यांची प्रतिमा उंचावली आहे.

या विजयाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. हा मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचे मानले जात आहे. योगींच्या रूपाने भाजपच्या भविष्याची झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मार्ग सोपा झाल्याचाही तर्क आहे. याबरोबरच राष्ट्रपती निवडणुकीतही भाजपच्या या विजयाची मदत होणार आहे.

जनतेच्या विश्वासाचा विजय
शाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, सब का साथ सबका विकास व सबका विश्वास, ही केवळ घोषणा नाही, तर वस्तुस्थिती आहे. मोदी हे विश्वासाचे दुसरे नाव झाले आहे. या निकालाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही मोठ्या बहुमताचे सरकार बनवू, याचाही विश्वास दिला आहे.

‘गँगस्टर’वर घातला घाव
मार्च २०१७ मध्ये सत्तेत आल्यानंतर योगींनी यूपीचे वातावरण बदलण्याचे काम केले. पहिला घाव गुन्हेगार व माफियांवर घातला. गुन्हेगारांनी एक तर गुन्हे सोडावेत किंवा यूपी सोडावे, असे आवाहनच त्यांनी केले. राज्यात गँगस्टर ॲक्टनुसार अब्जावधी रुपयांची अवैध संपत्ती जप्त केली. २०१७ नंतर योगी सरकारने बारा हजारांपेक्षा जास्त वाँटेड गुन्हेगारांना अटक केल्याचा दावा केला. ६८० जणांविरुद्ध एनएसए लावला. गुन्हेगारांच्याविरोधात १५ हजार गुन्हे दाखल करून १,९०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. मुख्तार अन्सारी व अतिक अहमदसारख्या बाहुबलींविरोधात कारवाई करून नवीन धडा घालून दिला.

हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी यांच्यावरील जनतेच्या विश्वासाचा आहे. जाती व धर्माचा विचार न करता समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या विकासाचे धोरण अवलंबल्यामुळेच हे शक्य झाले.
- मुख्तार अब्बास नकवी,
केंद्रीय मंत्री 

योगींनी एकीकडे लोकांच्या मनात आपला दमदार विश्वास निर्माण केला व दुसरीकडे सरकारी योजना अशा प्रकारे लागू केल्या की, लोकांना थेट फायदा झाला. यूपीत ५.७७ कोटींपेक्षा अधिक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत २.८२ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाले.
१.६७ कोटी गरीब महिलांना उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर दिले. राज्यात १.१६ कोटी लोकांना मागीलवर्षी मनरेगा योजनेत काम मिळाले. स्वच्छ भारत अभियानात मागील आठ वर्षांत राज्यात २.२२ कोटी शौचालये उभारण्यात आली. 
पीएम आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत यूपीमध्ये गरीब कुटुंबांसाठी १२.१४ लाख घरे तयार करण्यात आली. याशिवाय केंद्र व राज्य सरकारांच्या अनेक योजनांद्वारे पैसा थेट लोकांच्या खिशात पोहोचविला. यामुळे महागाई व बेरोजगारीची तीव्रता कमी झाली.

Web Title: ‘Double Engine’ government wins public trust; The path to Lok Sabha and Presidential elections has become easier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.