सचिनचे पोलीस तपासात असहकार्यच दुहेरी हत्या प्रकरण : कारागृहात झाली रवानगी
By admin | Published: May 21, 2016 12:06 AM2016-05-21T00:06:53+5:302016-05-21T00:06:53+5:30
जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील खोलीत घडलेल्या माय-लेकीच्या दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन गुमानसिंग जाधव (वय ३८) हा पोलिसांना तपासकामात सहकार्य करीत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हत्येसाठी इंजेक्शन व विषारी औषध कोठून आणले? याची खरी माहिती त्याने पोलीस कोठडीत दिलेलीच नाही.
Next
ज गाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील खोलीत घडलेल्या माय-लेकीच्या दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन गुमानसिंग जाधव (वय ३८) हा पोलिसांना तपासकामात सहकार्य करीत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हत्येसाठी इंजेक्शन व विषारी औषध कोठून आणले? याची खरी माहिती त्याने पोलीस कोठडीत दिलेलीच नाही.सचिनने त्याची पत्नी कविता व मुलगी रेणाक्षी यांची विषारी इंजेक्शन देऊन हत्या केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याला सदरचे इंजेक्शन व औषध कोठून आणले होते? याची माहिती विचारली. त्यावर त्याने, आपण दोन्ही वस्तू राजस हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया गृहातून घेतल्याचे सांगितले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी राजस हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र सरोदे यांना त्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया गृहातून कोणतेही इंजेक्शन अथवा औषध गेलेले नाही. माहितीनुसार, योग्य तो साठा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सचिनने इंजेक्शन व औषध नेमके कोठून आणले? हे अस्पष्टच आहे.न्यायालयीन कोठडीदरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जिल्हापेठ पोलिसांनी सचिनला शुक्रवारी दुपारच्या सुमारास न्यायाधीश एस.एस. घोरपडे यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरकारतर्फे ॲड.हेमंत मेंडकी यांनी तर आरोपीतर्फे ॲड.वीरेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले.