कांदा निर्यातीला दुप्पट सबसिडी; केंद्राचा उत्पादकांना दिलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:05 AM2018-12-29T05:05:26+5:302018-12-29T05:05:35+5:30
कांदा निर्यातीवर देण्यात येणारी ५ टक्के सबसिडी वाढवून १० टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात कांद्याचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली : कांदा निर्यातीवर देण्यात येणारी ५ टक्के सबसिडी वाढवून १० टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात कांद्याचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. निर्यात वाढल्यास कांद्याची उपलब्धता कमी होऊन भाव वाढू शकतील. त्यामुळे सबसिडी वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मर्चंडाईज एक्स्पोर्टस् फ्रॉम इंडिया (एमईआयएस) या योजनेंतर्गत कांदा निर्यातीवर सध्या ५ टक्के सबसिडी देण्यात येते. या सबसिडीची मुदत १२ जानेवारी २०१९ रोजी संपत आहे. सबसिडीची रक्कम १० टक्के करून ३० जून २०१९ पर्यंत ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.