राजधानी एक्सप्रेसमध्ये दरोडा, कोच अटेंडंट आणि दरोडेखोरांची मिलीभगत असल्याची शंका
By admin | Published: April 9, 2017 03:33 PM2017-04-09T15:33:41+5:302017-04-09T15:33:41+5:30
देशात सर्वात आरामदायी प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या राजधानी एक्स्प्रेसवर दरोडा टाकल्याची घटना
Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 9 - देशात सर्वात आरामदायी प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या राजधानी एक्स्प्रेसवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. शनिवारी दिल्लीहून पाटणा जाणा-या राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिहारमधील बक्सरजवळ हा दरोडा पडला.
दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटून त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. कोच अटेंडंटलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरोडेखोरांबरोबर त्याची मिलीभगत असल्याचा आरोप आहे. कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवतआरपीएफच्या एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.याशिवाय 6 कॉन्स्टेबल यांनाही निलंबित करण्यात आल्याचं वृत्त आहे.
राजधानी एक्सप्रेसच्या एसी २ आणि एसी ३ या डब्यातल्या प्रवाशांना दरोडेखोरांनी लक्ष्य केलं. प्रवाशांचा लाखोंचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला. या घटनेनंतर पीडित प्रवाशांनी पाटणा रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं.