Dove आणि Tresemmé शॅम्पूमुळे कँसर? यूनिलीव्हरने आपले प्रोडक्ट परत मागवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 06:16 PM2022-10-26T18:16:25+5:302022-10-26T18:17:29+5:30
जगातील आघाडीची FMCG कंपनी Unilever ने Dove आणि Tresemé सह त्यांचे अनेक ड्राय शॅम्पू परत मागवले आहेत.
जगातील आघाडीची FMCG कंपनी Unilever ने Dove आणि Tresemé सह त्यांचे अनेक ड्राय शॅम्पू परत मागवले आहेत. या शाम्पूमध्ये कार्सिनोजेनिक केमिकल बेंझिन असल्याचा खुलासा कंपनीने केला होता. त्यानंतरच कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने जे ब्रँड मागे घेतले आहेत त्यात Nexxus, Suave, Tresemme आणि Tiggy यांचा समावेश आहे.
डोक्यात जास्त कोंडा झाल्यास हे शॅम्पू वापरले जातात. कंपनीने ऑक्टोबर 2021 पूर्वी तयार केलेले शाम्पू मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे एरोसोल पर्सनल केअर उत्पादनांवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. एरोसोल पर्सनल केअर प्रोडक्ट अशी उत्पादने आहेत, जी प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये द्रव पदार्थ म्हणून भरली जातात. दीड वर्षात अनेक ब्रँड्सनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची पर्सनल केअर उत्पादने वापर मागवली आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनने न्यूट्रोजेना मागे घेतले. याशिवाय एजवेल पर्सनल केअरने बनाना बोट परत मागवले होते. याशिवाय अनेक कंपन्यांनी आपली उत्पादने मागे घेतली आहेत.
गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या एका संशोधनाअंतर्गत या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक रासायनिक बेंझिन आढळल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. स्प्रे ड्राय शैम्पूमध्ये समस्या आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही. P&G मधून Pantene आणि हर्बल शैम्पू देखील मागे घेण्यात आले आहेत. यामुळेच ड्राय शॅम्पू मागे घेण्यात येत असल्याचे युनिलिव्हरचे म्हणणे आहे. कंपनीने त्यांच्या उत्पादनांमध्ये किती कार्सिनोजेनिक केमिकल बेंझिन आढळले आहे हे सांगितले नाही, परंतु धोका लक्षात घेऊन उत्पादने मागे घेण्याचे सांगितले आहे.