डाऊनलोड स्पीडमध्ये भारत नेपाळ, बांगलादेशच्याही मागे

By admin | Published: December 23, 2016 08:05 AM2016-12-23T08:05:39+5:302016-12-23T08:57:33+5:30

डाऊनलोड स्पीडमध्ये भारताचा 96 वा क्रमांक लागतो आणि सरासरी बॅण्डविड्थ उपलब्धतेत 105 व्या क्रमांकावर आहोत

Download Speed ​​India Bharat, Bangladesh also behind | डाऊनलोड स्पीडमध्ये भारत नेपाळ, बांगलादेशच्याही मागे

डाऊनलोड स्पीडमध्ये भारत नेपाळ, बांगलादेशच्याही मागे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - भारतात कॅशलेस आर्थिक व्यवहार नियमित होण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे सर्वात चांगला इंटरनेट स्पीड आणि उत्तर सायबर सुरक्षा. नोटाबंदीमुळे सध्या डिजीटल आर्थिक व्यवहार करण्यावर भर देण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र डाऊनलोड स्पीडमध्ये भारताचा 96 वा क्रमांक लागतो आणि सरासरी बॅण्डविड्थ उपलब्धतेत 105 व्या क्रमांकावर आहोत. आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. डाऊनलोड स्पीडमध्ये आपण नेपाळ आणि बांगलादेशच्याही मागे आहोत. सायबर हल्ल्यांमध्ये मात्र आपण वरच्या स्थानावर आहोत. बँकांच्या आणि संवेदनशील, गुपित माहितीवर सहज डल्ला मारला जात आहे. 
 
(मुंबई, ठाणे आणि पुण्यात इंटरनेटवर सायबर हल्ला)
 
भारतामधील या परिस्थितीमुळे युझर्स आणि एक्स्पर्ट्स दोघेही चिंतेत आहेत. सायबर एक्स्पर्ट्सच्या म्हणण्याप्रमाणे 'भारतातील लोक सायबर व्यवहार करायला घाबरतात. कारण यामध्ये हॅकिंग होऊन आपली वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची भीती असते. आणि अशावेळी बँक आणि पोलीस मात्र कारवाई करण्याऐवजी हतबलता दाखवत असतात',. सायबर एक्स्पर्ट विजय मुखी यांनी 'आपल्यासारखी व्यक्तिदेखील ऑनलाइन व्यवहार करताना घाबरते', असं सांगितलं आहे.
 
(इंटरनेट स्पीड मोजणारे अ‍ॅप)
 
सुरक्षित ऑनलाइन व्यवहार व्हावा यासाठी सरकारकडूनच काही पावलं उचलण्याची गरज असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. सायबर हल्ल्यांविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा भारताचा सहावा क्रमांक लागतो. फक्त एका वर्षात सायबर हल्ले दुपटीने वाढले आहेत. 
 
बॅण्डविड्थ उपलब्धतेबद्दल बोलायचं गेल्यास श्रीलंका, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया यांच्यासह अनेक देश आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. सायबर तज्ञांनी डिजीटल व्यवहाराचं स्वागत केलं आहे, मात्र आयटीला मिळणा-या पायाभूत सुविधा आणि शिक्षणावरुन नाराजी व्यक्त केली आहे. 
 
'कार्डद्वारे व्यवहार केला जातो तेव्हा कोणीही आपला पिन क्रमांक किंवा ओटीपी कोणाला देऊ नये. लोक बनावट फोन करुन बँक किंवा सुरक्षेच्या कारणास्तव माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कार्ड स्वाईप करताना आपल्यासमोर करत जा', असं नागपूरचे पोलीस उपायुक्त (सायबर क्राईम) सचिन पाटील यांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: Download Speed ​​India Bharat, Bangladesh also behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.