कोतवाल संघटनेतर्फे ९ रोजी धरणे आंदोलन

By admin | Published: February 8, 2016 10:55 PM2016-02-08T22:55:23+5:302016-02-08T22:55:23+5:30

कोतवाल संघटनेतर्फे ९ रोजी धरणे आंदोलन

Dowry movement on 9th by Kotwala Sanghatana | कोतवाल संघटनेतर्फे ९ रोजी धरणे आंदोलन

कोतवाल संघटनेतर्फे ९ रोजी धरणे आंदोलन

Next
तवाल संघटनेतर्फे ९ रोजी धरणे आंदोलन
जळगाव : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करावे या मागणीसाठी ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय कोळी, विभागीय अध्यक्ष संजय धरम, डॉ.दिलीप साळवे, पांडुरंग कोळी, भिकन गायकवाड, प्रवीण चिखलकर, उखर्डू सोनवणे यांनी केले आहे.

जनसंग्रामच्या आंदोलनाची जिल्हाधिकार्‍यांकडून दखल
जळगाव : जनसंग्राम सामाजिक संघटना प्रणित महाराष्ट्र राज्य ठेवीदार समितीतर्फे ५ रोजी करण्यात आलेल्या शेवमुरमुरे आंदोलनाची जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेतली आहे. बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांना आंदोलनकांसोबत तत्काळ बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. ५ रोजी हे आदेश जारी करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक समन्वयक दीपक मांडोळे यांनी दिले आहे.

स्टोन क्रशर महसूल वसुलीचे केले कौतुक
जळगाव : स्टोन क्रशरचालकांकडून करण्यात येणार्‍या महसूल वसुलीच्या प्रक्रियेचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी कौतुक केले आहे. अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी एक ब्रास खडीसाठी किती युनिट वीज लागते याबाबत समितीच्या माध्यमातून प्रमाण तयार केले होते. या माध्यमातून जिल्हाभरातील चार कोटी रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या प्रक्रियेचे पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले. त्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे व विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी कौतुक केले आहे.

विशेष वसुली अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण
जळगाव : जिल्हा उपनिबंधक कार्यालय व सहकार भारती यांच्या संयुक्तविद्यमाने १२ व १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळेत सहकारी संस्थांचे व बँकाचे कर्ज वसुली करणार्‍या विशेष वसुली अधिकारी व कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या हस्ते होईल. यावेळी सहकार भारतीचे अध्यक्ष संजय बिर्ला, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहील. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Dowry movement on 9th by Kotwala Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.