सरकारी इस्पितळात काम करण्यास डॉक्टर अनुत्सुक उपमुख्यमंत्री : सुकुर येथे उपआरोग्य केंद्राचे उद्घाटन
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:24+5:302014-12-20T22:27:24+5:30
पर्वरी : डॉक्टरांची अनुपलब्धतेमुळे सरकारला प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रे चालविणे कठीण जाते. गोव्यामध्ये डॉक्टर सरकारी इस्पितळात काम करण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे नागरिकांना समाधानकारक सेवा देणे अडचणीचे ठरते, असे उद्गार उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांनी सुकुर येथे काढले. सुकुर पंचायत घरात आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
Next
प ्वरी : डॉक्टरांची अनुपलब्धतेमुळे सरकारला प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रे चालविणे कठीण जाते. गोव्यामध्ये डॉक्टर सरकारी इस्पितळात काम करण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे नागरिकांना समाधानकारक सेवा देणे अडचणीचे ठरते, असे उद्गार उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांनी सुकुर येथे काढले. सुकुर पंचायत घरात आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, की हल्लीच आरोग्य खात्याने ५० डॉक्टरांची नेमणूक करण्यासाठी वर्तमानपत्रातून जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु त्यास प्रतिसाद मिळावा तितका मिळाला नाही फक्त १५ डॉक्टरांनी अर्ज केला. अशी परिस्थती राहिली तर सरकारला ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रे चालविणे कठीण जाईल, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी आमदार रोहन खंवटे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की पर्वरी मतदारसंघात आरोग्य उपकेंद्रांची आवश्यकता होती. सरकारला विनंती केल्यानुसार त्वरित आपली मागणी पूर्ण झाली. सुकुर पंचायतीची लोकसंख्या ९५०० वर आहे आणि या भागात आरोगय उपकेंद्राची नितांत गरज होती. सुकुरला आरोग्य उपकेंद्र उघडून सरकारने येथील ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली याचेच समाधान वाटते. सरकारने पर्वरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला हिरवा कंदील दाखविला आहे आणि जागाही निश्चित केली आहे. सरकारने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलून प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करावी, अशी विनंती खंवटे यांनी यावेळी आरोग्यमंत्र्यांपाशी केली आहे.यावेळी सुकुर पंचायतीच्या सरपंच सोनिया पेडणेकर, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी, हळदोणे आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी मारिया सिकेरा आणि पंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मारिया सिकेरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. रोशन नाझारेथ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)फोटो ओळी-सुकुर आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा, सोबत आमदार रोहन खंवटे, सरपंच सोनिया पेडणेकर व इतर मान्यवर. (छाया : शेखर वायंगणकर)