महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन, चैत्यभूमीवर भीमसैनिकांची रात्रीपासून गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 07:12 AM2018-04-14T07:12:41+5:302018-04-14T07:57:40+5:30
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहेत.
मुंबई- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रात्रीपासून भीमसैनिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
LIVE:
जळगाव- जामनेर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीला उत्साहात सुरुवात. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मिरवणुकीत लेझीम खेळून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा.
Greetings on Ambedkar Jayanti. Pujya Babasaheb gave hope to lakhs of people belonging to the poorest and marginalised sections of society. We remain indebted to him for his efforts towards the making of our Constitution.
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2018
सभी देशवासियों को अम्बेडकर जयंती की शुभकामनाएं। जय भीम! pic.twitter.com/NZW6QsKgN0
मुंबई- थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी. विद्यासागर राव चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना करणार अभिवादन.
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकल गेट येथे रात्री 12 वाजता आतिषबाजी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी जमली होती.