डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेल्या केंद्रीय वैद्यकीय शिक्षण समितीवर डॉ. गिरीष मैंदरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:01 AM2017-09-21T05:01:43+5:302017-09-21T05:01:45+5:30

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पुनर्मुल्यांकन करण्याचे काम मानव संसाधन मंत्रालयाने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हाती घेतले आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समिती बनविण्यात आली असून त्यावर मुंबई सीपीएसचे (कॉलेज आॅफ फिजीशियन) अध्यक्ष डॉ. गिरीष मैंदरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dr. On the Central Medical Education Committee chaired by Kasturirangan, Dr. Girish Mandarkar | डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेल्या केंद्रीय वैद्यकीय शिक्षण समितीवर डॉ. गिरीष मैंदरकर

डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेल्या केंद्रीय वैद्यकीय शिक्षण समितीवर डॉ. गिरीष मैंदरकर

googlenewsNext

नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पुनर्मुल्यांकन करण्याचे काम मानव संसाधन मंत्रालयाने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हाती घेतले आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समिती बनविण्यात आली असून त्यावर मुंबई सीपीएसचे (कॉलेज आॅफ फिजीशियन) अध्यक्ष डॉ. गिरीष मैंदरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षणात कोणते बदल घडवायला हवेत यासाठी ही समिती शिफारशी देणार आहे. डॉ. गिरीष मैंदरकर हे बालरोगतज्ञ असून ते मुळचे लातूरचे आहेत. मुंबईतल्या सगळ्यात जुन्या सीपीएस या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. या समितीचे समन्वयक म्हणून बेंगलोरच्या असोसिएशन आॅफ हॉस्पीटल सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे अध्यक्ष डॉ. अलेक्झांडर थॉमस यांना निवडण्यात आले आहे. समितीवर नारायणा हेल्थ केअरचे डॉ. देवी शेट्टी, ख्रिश्चन मेडीकल कॉलेजचे डॉ. अन्ना पुलीमोड, राष्टÑीय परीक्षा परिषदचे डॉ. बबीतोष बिश्वास, हेल्थ युनिर्व्हसिटी असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष डॉ. ओ.पी. कारला, बेंगलोरच्या निमहॅम्सचे संचालक डॉ. बी.एन. गंगाधर व एअरफोर्स मेडीकल सर्व्हिसेसचे महासंचालक डॉ. पवन कपूर यांचा समावेश आहे.

Web Title: Dr. On the Central Medical Education Committee chaired by Kasturirangan, Dr. Girish Mandarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.