अरे व्वा! ...अन् एक सिंगर झाला IAS अधिकारी; सोपा नव्हता प्रवास, वडिलांनी दिलं प्रोत्साहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:08 PM2022-12-30T17:08:49+5:302022-12-30T17:10:50+5:30

IAS Hari Om : डॉ. हरिओम हे सिंगर बनण्याचे स्वप्न पाहत आयएएस अधिकारी झाले. त्यांच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

dr hari om singer became an ias officer but the journey was not easy read full story | अरे व्वा! ...अन् एक सिंगर झाला IAS अधिकारी; सोपा नव्हता प्रवास, वडिलांनी दिलं प्रोत्साहन

फोटो - झी न्यूज

Next

नागरी सेवा परीक्षा (UPSC) ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात, तर काही अनेक प्रयत्नांनंतर यशस्वी होतात. मात्र, व्यवसायासोबतच छंद जोपासणे हे आव्हानापेक्षा कमी नाही. तेही त्यांच्यावर प्रशासकीय कामाची जबाबदारी असताना... यूपी कॅडरचे आयएएस अधिकारी डॉ. हरिओम यांचीही अशीच गोष्ट आहे, पण यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांसाठी हे आव्हान लहानच आहे. 

1997 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले डॉ. हरिओम हे सिंगर बनण्याचे स्वप्न पाहत आयएएस अधिकारी झाले. त्यांच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही दिवसांपूर्वी त्याच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होता. हा व्हिडीओ काश्मीरमधला आहे जिथे हरिओम त्याच्या मित्रांसोबत डल लेकजवळ गाणे म्हणत आहे. डॉ हरिओम यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील कटारी या छोट्याशा गावात झाला

सुरुवातीच्या शिक्षणानंतर ग्रॅज्युएशन करण्यासाठी अलाहाबादला आले. त्यांचे बालपणही गझल, गाणी आणि भजन कीर्तनात गेले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, त्यांचे वडील त्यांना आयएएस आणि पीसीएसच्या तयारीसाठी प्रोत्साहन द्यायचे, परंतु हरी ओमने फक्त चांगला विद्यार्थी होण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शिक्षकांनी सांगितले की, ते एक हुशार विद्यार्थी होते आणि त्याच्यात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याची क्षमता होती.

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर हरिओम 1992 मध्ये जेएनयूमध्ये आले. येथील विद्यार्थी आयएएसबद्दल अधिक गंभीर होते, त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत असल्याने परीक्षेसाठी आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन येथे मिळू शकले. हीच वेळ होती जेव्हा डॉ हरिओम यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी UPSC उत्तीर्ण केले आणि 1997 मध्ये IAS साठी निवड झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: dr hari om singer became an ias officer but the journey was not easy read full story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.