देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:35 PM2021-04-07T12:35:28+5:302021-04-07T12:37:36+5:30

corona vaccine : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशभरातील ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली.

dr harsh vardhan says there is no corona vaccine shortage in any part of the country | देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन

Next
ठळक मुद्देनिष्काळजीपण कोरोनाचा कहर वाढण्याचे कारण - हर्षवर्धनकोरोना वाढ चिंतेचा विषय - हर्षवर्धनकेंद्र शासनाने मागणीप्रमाणे पुरवठा करावा - राजेश टोपे

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येचा उच्चांक नोंदवला जात आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. दुसरीकडे, कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशभरातील ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते. (dr harsh vardhan says there is no corona vaccine shortage in any part of the country)

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. हर्षवर्धन यांनी देशात परिस्थिती नियंत्रणात असून, अनेक त्रुटी दाखवून दिल्या. 

अमेरिकेत १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस; राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा

निष्काळजीपण कोरोनाचा कहर वाढण्याचं कारण

बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपण कोरोनाचा कहर वाढण्याचे कारण असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद करत  कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ असून मृत्यूदर १.३० टक्के असल्याचे ते म्हणाले. सर्व गोष्टी पुन्हा सुरू झाल्या असून, लोकांचे निष्काळजीपणे वागणे चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना वाढ चिंतेचा विषय

गेल्या दोन महिन्यात देशातील कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. आपल्यासाठी हा चिंतेचा विषय आहे. एक वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याकडे खूप ज्ञान आहे, पण अद्यापही अनेक त्रुटी आहेत. पण मला वाटते सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे. याआधी असलेले धोरण आपण नीट राबवले, तर संख्या कमी होईल, असा विश्वास हर्षवर्धन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

...तर कोविशिल्डची लस ९० टक्के प्रभावी; अदर पूनावालांनी महत्त्वाची माहिती

केंद्र शासनाने मागणीप्रमाणे पुरवठा करावा

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे कोरोना लसींचा पुरवठा करावा. महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, असे विविध मुद्दे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी मांडले.

दरम्यान, राज्यात २५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडेही या मागणीचा पुनरुच्चार केला. कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.
 

Web Title: dr harsh vardhan says there is no corona vaccine shortage in any part of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.