डॉ. हेपतुल्ला, आझाद यांना संसदीय पुरस्कार, पाच वर्षांनंतर होणार कामगिरीचा गौरव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:27 AM2018-01-30T02:27:21+5:302018-01-30T02:27:34+5:30

भारतीय संसदीय गटाने (इंडियन पार्लमेंटली ग्रुप) तब्बल ५ वर्षांनी या वर्षी संसदेत भरीव कामगिरी करणाºयांचा सत्कार करण्याचे ठरविले असून, डॉ. नजमा हेपतुल्ला यांची राज्यसभेतील कार्यासाठी (सन २0१३) निवड झाली आहे. त्या आता मणिपूरच्या राज्यपाल आहे. याखेरीज भाजपाचे हुकूमदेव नारायण यादव यांची लोकसभेतील कार्यासाठी (सन २0१४) निवड झाली आहे.

 Dr. Heptullah, Azad will be honored with the Parliamentary Award, the performance of five years | डॉ. हेपतुल्ला, आझाद यांना संसदीय पुरस्कार, पाच वर्षांनंतर होणार कामगिरीचा गौरव  

डॉ. हेपतुल्ला, आझाद यांना संसदीय पुरस्कार, पाच वर्षांनंतर होणार कामगिरीचा गौरव  

Next

नवी दिल्ली : भारतीय संसदीय गटाने (इंडियन पार्लमेंटली ग्रुप) तब्बल ५ वर्षांनी या वर्षी संसदेत भरीव कामगिरी करणाºयांचा सत्कार करण्याचे ठरविले असून, डॉ. नजमा हेपतुल्ला यांची राज्यसभेतील कार्यासाठी (सन २0१३) निवड झाली आहे. त्या आता मणिपूरच्या राज्यपाल आहे. याखेरीज भाजपाचे हुकूमदेव नारायण यादव यांची लोकसभेतील कार्यासाठी (सन २0१४) निवड
झाली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची २0१५ सालच्या कामगिरीसाठी निवड करण्यात आली असून,
तृणमूल काँग्रेसचे सदस्य दिनेश त्रिवेदी (लोकसभा) यांची २0१६ सालासाठी, तर बिजू जनता दलाचे भर्तुहारी मेहताब (लोकसभा)
यांची २0१७ सालासाठी निवड झाली आहे.

पुरस्कार कधीपासून?

हे पुरस्कार १९९५ साली सुरू करण्यात आले होते आणि पहिला पुरस्कार माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांना, तर त्यानंतरच्या वर्षांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी व माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आले होते.
 

Web Title:  Dr. Heptullah, Azad will be honored with the Parliamentary Award, the performance of five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.