कौतुकास्पद! डेंटिस्ट झाली IAS, नोकरी करताना केली परीक्षेची तयारी; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 06:31 PM2023-10-18T18:31:40+5:302023-10-18T18:32:18+5:30
डॉ. नेहा जैन हिने यूपीएससी उत्तीर्ण केली असून ती आता आयएएस अधिकारी झाली आहे. नेहाचा जन्म दिल्लीत झाला आहे.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक सक्सेस स्टोरी आता समोर आली आहे. डेंटिस्ट असलेल्या तरुणीने आता घवघवीत यश संपादन केलं आहे. डॉ. नेहा जैन हिने यूपीएससी उत्तीर्ण केली असून ती आता आयएएस अधिकारी झाली आहे. नेहाचा जन्म दिल्लीत झाला आहे.
नेहाचे आई-वडील पीके जैन आणि मंजुलता जैन एका विमा कंपनीत काम करतात. तर त्याचा धाकटा भाऊ डॉक्टर आहे. नेहाला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती आणि ती बारावीनंतर बीडीएस केल्यानंतर डेंटिस्ट झाली. त्यांनी मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसमधून बीडीएस पदवी प्राप्त केली. यानंतर तिने डेंटल कंसल्टेंट म्हणून काम सुरू केलं.
काहीतरी बदल घडवून आणू शकेल असं काहीतरी तिला करायचं होतं. शेवटी तिने आयएएस होण्याचा निर्णय घेतला. डॉ. नेहा जैन यूपीएससीच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेसमध्ये रुजू झाली. जिथे तिने चालू घडामोडींवर लक्ष्य ठेवलं. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीसाठी चार ते पाच तास दिले तर ते पुरेसे आहेत, असं नेहाचं मत आहे.
डॉ. नेहा जैन सांगते की, तिने बेसिक्सपासून सुरुवात केली. तिचं लेखन कौशल्य सुधारण्यासाठी ती दररोज वर्तमानपत्रातील संपादकीय वाचत असे. वर्तमानपत्रे वाचून चालू घडामोडीही अपडेट होत होत्या. तिने मॉक टेस्ट दिल्या. त्याच्या रिझल्टवरून, तिला अनेक गोष्टी समजल्या आणि त्यावर तिने कठोर परिश्रम घेतले.
नेहा मुख्य तयारीसाठी उत्तर लिहिण्याचा भरपूर सराव करण्याचा सल्ला देते. याशिवाय, तुमची उत्तरं अनेक वेबसाईटवर देखील पोस्ट केली जाऊ शकतात. दररोज किमान चार ते पाच उत्तरं लिहा. तिने UPSC 2017 मध्ये ऑल इंडिया 14 वा रँक मिळवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.