Coronavirus: “कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 01:31 PM2021-07-01T13:31:24+5:302021-07-01T13:32:18+5:30

Coronavirus: आता कोरोनाच्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी उत्तम पद्धत एम्स प्रमुखांनी सांगितली आहे.

dr randeep guleria says if we follow corona rules we will be safe against any variants | Coronavirus: “कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”

Coronavirus: “कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”

Next

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली असतील, तरी तिसऱ्या लाटेचा देण्यात आलेला इशारा आणि कोरोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट यामुळे देशाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. यातच आता कोरोनाच्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी उत्तम पद्धत एम्स प्रमुखांनी सांगितली आहे. (dr randeep guleria says if we follow corona rules we will be safe against any variants)

दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, डेल्टा व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे तो जास्त संसर्गजन्य आहे का, त्याच्यामुळे अधिक मृत्यू होत आहेत का, असे सांगता येणार नाही. परंतु, आपण कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम योग्य पद्धतीने पाळले तर आपण कोणत्याही संभाव्य व्हेरिएंटपासून बचाव करू शकतो, असे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले आहे. 

“निवडणुका म्हणजे अत्याचार दूर होण्याची हमी नाही”: सरन्यायाधीश

कोरोना नियमांचा प्रभावी वापर हाच उपाय

कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, विशेषतः हात वारंवार धुणे, सुरक्षित अंतर राखणे, यांसारख्या उपायांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत, असेही डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. देशात कोरोनाचा नवा प्रकार डेल्टा व्हेरिएंटचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशभरातील १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत.

कोव्हॅक्सिन कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी

भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेली कोव्हॅक्सिन लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटला प्रभावीपणे नष्ट करत असल्याचे दिसून आले आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने नमूद केले आहे. कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेल्या दोन नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठीच्या अँटीबॉडी आढळून आल्या आहेत, असे अमेरिकेच्या आरोग्य संस्थेकडून सांगण्यात आले आहे.  

“प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण...”; पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा सूचक इशारा!

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातल्या नागरिकांनी देखील मास्क घालणे आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
 

Web Title: dr randeep guleria says if we follow corona rules we will be safe against any variants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.