Dr. Ravi Godse on Omicron: तिसरी लाट टाळायची असेल तर...या दोन गोष्टी आजच करा; डॉ. रवी गोडसेंचा महत्वाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 06:32 PM2021-12-05T18:32:30+5:302021-12-05T18:33:08+5:30
Dr. Ravi Godse advice on Omicron: कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिअंटचे संक्रमण होत आहे. परंतू त्याची तिव्रता कमी असून देशात फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिअंटचे संक्रमण होत आहे. परंतू त्याची तिव्रता कमी असून देशात फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही तिसरी लाट येण्याआधीच संपवायची असेल तर अमेरिकेत असलेले डॉ. रवी गोडसे यांनी सरकारला आणि नागरिकांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
केंद्र सरकार काही ठराविक परिस्थितीत लोकांना बुस्टर डोस देण्याचा विचार करत आहे. तर जगातील सर्वात महागडी लस कोव्हॅक्सिनच्या कंपनीनेही आपली लस ओमायक्रॉनवर परिणामकारक असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. डॉ. रवी यांनी भारताला तातडीने दोन गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे.
Do these 2 things! 2 day! pic.twitter.com/YVcLwLxwgn
— DrRavi (@DrGodseRavi1) December 4, 2021
जे 18 वर्षांवरील लोक स्वखर्चातून जर बुस्टर डोस घेण्यास तयार असतील त्यांना बुस्टर डोस द्यावा. तसेच 18 वर्षांखालील लोकांना कोरोनाची नेहमीची लस द्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, तरीही जर तिसरी लाट रोखायची असेल तर हे आपल्याला आजच करावे लागेल, असेही गोडसे यांनी म्हटले आहे.