नारीशक्ती! चंद्रयान-3 च्या यशामागे 'या' महिलेचा मोठा हात; लोक म्हणतात 'रॉकेट वुमन'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:24 PM2023-08-25T13:24:32+5:302023-08-25T13:26:47+5:30

भारतातील "रॉकेट वुमन" म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. रितू करिधल श्रीवास्तव या उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहेत.

dr ritu karidhal srivastava is behind the success of chandrayaan 3 known as rocket woman | नारीशक्ती! चंद्रयान-3 च्या यशामागे 'या' महिलेचा मोठा हात; लोक म्हणतात 'रॉकेट वुमन'

नारीशक्ती! चंद्रयान-3 च्या यशामागे 'या' महिलेचा मोठा हात; लोक म्हणतात 'रॉकेट वुमन'

googlenewsNext

'इस्रो'ने चंद्रयान-3 चंद्रावर नेऊन ऐतिहासिक कामगिरी आहे. इस्रोने 14 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2.35 वाजता चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण केले आणि 41 दिवसांनी विक्रम लँडर चंद्रावर पोहोचलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध घेणं आणि त्याबद्दल जाणून घेणं हा त्याचा उद्देश आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या डॉ. रितू करिधल श्रीवास्तव यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं आहे.

भारतातील "रॉकेट वुमन" म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. रितू करिधल श्रीवास्तव या उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहेत. त्यांनी लखनौ विद्यापीठातून शिक्षण घेतलं. नंतर, त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमई पदवी प्राप्त केली. डॉ. रितू करिधल 1997 मध्ये इस्रोमध्ये रुजू झाल्या. त्या चंद्रयान-2 च्या मिशन डायरेक्टर आणि मंगळयानच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 20 हून अधिक जर्नल्स प्रकाशित केली आहेत. 

इस्रो आणि नासाच्या पेपर कटिंग्जचा त्यांच्याकडे संग्रह आहे. डॉ. रितू करिधल नेहमीच अंतराळाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि काहीतरी अनोखं करण्याचं त्यांचं ध्येय असतं. याशिवाय त्यांना एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते 'इस्रो यंग सायंटिस्ट अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजीज अँड इंडस्ट्रीज (SIATI) द्वारे 'ISRO टीम अवॉर्ड फॉर एमओएम (2015)', 'ASI टीम अवॉर्ड', 'वुमन अचिव्हर्स इन एरोस्पेस' (2017) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर मासूम मिनावाला यांनी यावर रील बनवलं आहे. "जसं जग चंद्रयान-3 चा आनंद साजरा करत आहे, तेव्हा या मोहिमेचा एक भाग असलेल्या 'रॉकेट वुमन ऑफ इंडिया'चा सन्मान करण्यासाठी थोडा वेळ काढूया. अनेक मुलींना त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली आहे. हा महत्त्वपूर्ण क्षण अब्ज हृदयांच्या भावनाचं प्रतिक आहे. आम्ही डॉ. रितू करिधल सारख्या दूरदर्शी लोकांचे मनःपूर्वक आभार मानतो" असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. चंद्रयान-3 मोहिमेच्या रूपाने डॉ. रितू यांच्या अभूतपूर्व कामगिरीचं नेटिझन्सकडून प्रचंड कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: dr ritu karidhal srivastava is behind the success of chandrayaan 3 known as rocket woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.