डॉ. आंबेडकरांचे श्रेय दाबण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:35+5:302015-02-14T23:51:35+5:30
सुखदेव थोरात : जल, सिंचन, उर्जा क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान
Next
स खदेव थोरात : जल, सिंचन, उर्जा क्षेत्रातही महत्त्वाचे योगदानपुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच देशाचे जल, सिंचन आणि उर्जा धोरण तयार केले. मात्र, त्यांचे श्रेय दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय जल आणि उर्जा दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी शनिवारी पुण्यात केली. डेक्कन कॉलेजच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य मागासावर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या १८व्या राज्यस्तरीय द्विवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटनप्रसंगी थोरात बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे, आमदार जगदीश मुळीक, संगीता ठोंबरे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघाचे अध्यक्ष अरुण भालेराव, कार्याध्यक्ष अशोक सोनवणे, किशोर अहिवळे, संजय घोडके, जे. एस. पाटील, राजू गायकवाड, सुधाकर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, 'डॉ. आंबेडकर यांनी दलितांच्या उत्थानासाठी केलेले कार्य सर्वांना माहित आहे. त्यांनी जल, सिंचन आणि उर्जा क्षेत्रातही भरीव काम केले आहे. या क्षेत्रांच्या नियोजनात त्यांनी मूलभूत भूमिका बजावली. 'थोरात म्हणाले, 'आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळेच खासगी क्षेत्रामध्ये समावेश असलेल्या विद्युत विभागाचा समावेश सरकारी क्षेत्रामध्ये झाला. वीज आणि पाणी हे उद्योगांसाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना ते सहज उपलब्ध व्हायला हवे. मात्र, उद्योगांचा फायदा तळागाळातील लोकांना व्हावा, याकडे उद्योगक्षेत्राने लक्ष द्यायला हवे, अशी भूमिका आंबेडकरांची होती,'पठारे म्हणाले, ' मागील २५ वर्षांत मध्यमवर्गाच्या विचारसरणीत कमालीचा फरक पडला आहे. मध्यमवर्गीय समाज हा फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेतो आणि कृती मात्र, अगदी या महापुरुषांच्या विचारांच्या विरुद्ध करतो. मी, माझा, मला हा व्यक्तीवाद मध्यमवर्गात प्रचंड फोफावला आहे. ही स्वकेंद्रित वृत्ती आधुनिक काळातील सर्वांत मोठी शोकांतिका म्हणायला हवी. मध्यमवर्गाला तळागाळातील वर्गाबद्दल आस्था उरलेली नाही. असेच चालले तर पुढच्या पिढीला समाज, देशाबद्दल प्रेम वाटणार नाही. येत्या १० वर्षांत ही परिस्थिती उद्भवू शकते. 'संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जारोंडे यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी).............जोड आहे...............