डाॅ. व्ही. नागेश्वरन देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 10:20 AM2022-01-29T10:20:42+5:302022-01-29T10:21:27+5:30
नियुक्तीआधी ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : डाॅ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. अर्थसंकल्प सादर हाेण्याच्या काही दिवस आधीच सरकारने डाॅ. नागेश्वरन यांच्या नियुक्तीची घाेषणा केली असून, त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
नियुक्तीआधी ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य हाेते. माजी मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२१मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नागेश्वरन यांच्या नियुक्तीची चर्चा हाेती. दरवर्षी देशाचा आर्थिक सर्वेक्षण तयार करण्यामध्ये नागेश्वरन
यांची प्रमुख भूमिका राहात असे. नागेश्वरन यांनी आयआयएम अहमदाबाद येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी मसॅच्युएट्स विद्यापीठातून डाॅक्टरेट पूर्ण केली आहे.