ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे राष्ट्रपतींच्याहस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 05:56 PM2017-09-22T17:56:29+5:302017-09-22T17:58:13+5:30

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केले.

Dragon Palace inaugurated the Vipassana Meditation Center's presidential inauguration | ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे राष्ट्रपतींच्याहस्ते उद्घाटन

ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे राष्ट्रपतींच्याहस्ते उद्घाटन

Next

नागपूर, दि. 22 -  कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे आदी यावेळीउपस्थित होते.

राष्ट्रपतींनी यावेळी विपश्यना सेंटरमधील बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर पाच मिनिटे ध्यानधारणा केली. कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात सुमारे 10 एकर परिसरात विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये 83 फुट उंचीचा आकर्षक असा मुख्य पॅगोडा बांधण्यात आला आहे. या पॅगोडाच्या चारही बाजूला दहा फुट उंचीचे चार पॅगोडा तयार करण्यात आले आहे. ओगावा सोसायटी तर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात मेडिटेशन सेंटर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे. राज्य शासनाने विपश्यना केंद्राच्या संकल्पनेची दखल घेऊन विपश्यना सेंटरसाठी अर्थसहाय उपलब्ध करुन दिले आहे. या सेंटरमध्ये विपश्यना साधन शिबीर घेण्यात येणार आहे.

विपश्यना मेडिटेशनमध्ये ध्यान साधनेकरीता दोन सभागृह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यात तळमजल्यावर चोवीस कक्ष बांधण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या माळयावर तीन हजार चौरस फुट क्षेत्रफळाच्या वर्तुळाकार धम्म सभागृह बांधण्यात आले आहे.  येथे 125 साधक एकाच वेळेस सामुहिक धम्म साधना करू शकतील. या ठिकाणी येणाऱ्या साधकांच्या निवासस्थानासाठी 2400 चौ. फुट क्षेत्रफळामध्ये स्वतंत्र आणि सामुहिक निवासव्यवस्था करण्यात आली आहे. भोजन व्यवस्थेकरीता महिला आणि पुरुषांकरीता स्वतंत्र दोन कक्ष बांधण्यात आले आहेत. सेंटरच्या सौंदर्यीकरणासाठी संपूर्ण भागात लॉन आणि बगीचा तयार करण्यात येणार आहे. या सेंटरच्या बांधकामाचा आराखडा प्रसिध्द शिल्पतज्ञ ठाकुरभाई पारेख तर इमारतीचे डिझाइन पी. टी. मसे असोशिएट्स यांनी केले आहे.

 बुद्ध वंदना

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट दिली. यावेळी त्यांनी बुद्ध मूर्तीचे दर्शन घेऊन बुद्ध वंदना  केली. याप्रसंगी सुलेखा कुंभारे यांनी प्रार्थना म्हटली. राज्यपाल चे. विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.

Web Title: Dragon Palace inaugurated the Vipassana Meditation Center's presidential inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.