ड्रॅगनचा शेजारी करतोय मोठी तयारी, आता भारताकडून 'ब्रह्मोस'नंतर करणार 'तेजस'ची खरेदी! चीनचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 07:38 PM2024-02-21T19:38:05+5:302024-02-21T19:39:54+5:30

अलिकडच्या काळात चीनचे वाढते प्रभूतत्व पाहता दक्षिण पूर्व आशियाई देशांची चिंता वाढली आहे. यामुळेच हे देश भारतासोबत संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे करार करत आहेत.

Dragon's neighbor Philippines is making big preparations, now will buy Tejas aircraft after Brahmos from India China's tension will increase | ड्रॅगनचा शेजारी करतोय मोठी तयारी, आता भारताकडून 'ब्रह्मोस'नंतर करणार 'तेजस'ची खरेदी! चीनचं टेन्शन वाढणार

ड्रॅगनचा शेजारी करतोय मोठी तयारी, आता भारताकडून 'ब्रह्मोस'नंतर करणार 'तेजस'ची खरेदी! चीनचं टेन्शन वाढणार

भारत आणि फिलीपिन्स दरम्यान संरक्षण क्षेत्रातील भागीदारी सातत्याने वाढत आहे. भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केल्यानंतर फिलीपिन्स सरकार आता तेजस फायटर जेट खरेदी करण्यास उत्सुक आहे. देशातील सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) फिलिपाइन्सला एलसीए तेजस एमके 1 नौदल व्हर्जनची ऑफर दिली आहे.

एचएएलनं फिलीपिन्स सरकारला दिली ऑफर - 
महत्वाचे म्हणजे एचएएलने फिलीपिन्स सरकारसमोर आपल्याच देशात जेटच्या निर्मितीची ऑफर दिली आहे. फिलीपिन्सने हा प्रस्ताव स्वीकारल्यास भारतासाठी संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने हे मोठे यश असेल. सध्या एचएएल भारतीय हवाई दलाला तेजस एमके-1 ए उपलब्ध करून देण्यात व्यस्त आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हे फायटरजेट ब्रह्मोससारख्या स्वदेशी बनावटीच्या खतरनाक मिसाइल्सने सुसज्ज आहे.

चीनच्या वाढत्या प्रभुत्वाने दक्षिण पूर्व आशियातील देश त्रस्त - 
अलिकडच्या काळात चीनचे वाढते प्रभूतत्व पाहता दक्षिण पूर्व आशियाई देशांची चिंता वाढली आहे. यामुळेच हे देश भारतासोबत संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे करार करत आहेत.

फिलीपिन्स माध्यमांतही होतेय चर्चा - 
फिलीपिन्सच्या माध्यमांमद्ये प्रसिद्ध होणार्या वृत्तांवर दृष्टी टाकली असता, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने तेथील फिलीपिन्स एयरोस्पेस डेव्हलपमेन्ट कॉर्पमध्ये तेजस एमके-1 असेम्बल करण्यासंदर्भात ऑफर दिली आहे.

Web Title: Dragon's neighbor Philippines is making big preparations, now will buy Tejas aircraft after Brahmos from India China's tension will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.