ड्रेनेज सफाईत भ्रष्टाचार स्थायी सभा: अभिप्रायासाठी एकमताने विषय फेरसादर
By Admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:46+5:302015-09-04T22:45:46+5:30
सोलापूर : ड्रेनेज सफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिल्यावर प्रशासनाने संबंधित अधिकार्याकडेच चौकशी देऊन प्रकरण स्थायी समितीकडे फेरसादर केले आहे. रुपाभवानी नाला ते विर्शांती चौक अशा 1493 मीटर ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झालेले नसताना सफाई झाल्याचे दाखवून बिल उचललेच कसे, अशी उपसूचना सुरेश पाटील यांनी मांडल्यावर चर्चेअंती हा विषय एकमताने फेरसादर करण्यात आला.
स लापूर : ड्रेनेज सफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिल्यावर प्रशासनाने संबंधित अधिकार्याकडेच चौकशी देऊन प्रकरण स्थायी समितीकडे फेरसादर केले आहे. रुपाभवानी नाला ते विर्शांती चौक अशा 1493 मीटर ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झालेले नसताना सफाई झाल्याचे दाखवून बिल उचललेच कसे, अशी उपसूचना सुरेश पाटील यांनी मांडल्यावर चर्चेअंती हा विषय एकमताने फेरसादर करण्यात आला. स्थायी समितीची सभा सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. सभेत 9 जानेवारीच्या सभेने परत पाठविलेला मुख्य ड्रेनेजलाईन साफसफाईच्या निविदेचा विषय प्रशासनाने फेरसादर केला होता. यावर उपसूचनेद्वारे सुरेश पाटील यांनी लक्ष वेधले. शहरातील 18 हजार मीटर ड्रेनेजलाईन सफाईचा मक्ता कोटा यांना देण्यात आला होता. 11 हजार 757 मीटरचे काम ठेकेदाराने केले. उर्वरित 6243 मीटरचे काम न करताच अधिकार्यांशी संगनमत करून रकमा उचलल्या. निविदा 77 लाख 62 हजारांची असताना 43 टक्के जादा दराने म्हणजे 1 कोटी 10 लाखाला ठेका मंजूर केला व केलेल्या कामापोटी 62 लाख 89 हजार ठेकेदाराला अदा केले. या विषयाकडे 9 जानेवारीच्या सभेत लक्ष वेधल्यावर फेरचौकशीत संबंधित अधिकार्यांनी मक्त्याच्या रकमेत 48 लाख 11 हजारांची बचत झाल्याचे नमूद केले आहे. बचत कोणत्या आधारे झाली याचा खुलासा संबंधित अधिकार्यांनी केलेला नाही. मागील सभेत विषय फेरसादर झाल्यावर सहायक आयुक्त अमिता दगडे?पाटील यांनी प्रकरण चौकशीसाठी गडबड केलेल्या अधिकार्यांकडेच दिले. दुलंगे व चलवादी दोषी असताना चुकीचा अहवाल सभेकडे पाठविला. त्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असून, संबंधित रक्कम अधिकार्यांच्या वेतनातून वसूल करावी व त्यांच्यावर कारवाई करावी व प्रकरण संपूर्ण अभिप्रायासह फेरसादर करावे अशी उपसूचना मांडली.हुतात्मा स्मृती मंदिर नूतनीकरणाच्या उद्घाटन खर्चास बहुमताने मंजुरी देण्यात आली. कार्यक्रमाला 6 पाहुणे आलेले असताना 22 शालींची खरेदी झाली. आलेल्या पाहुण्यांचा निवास, जेवण आणि फिरण्यासाठी मोठा खर्च दाखविण्यात आला. पत्रिका व सभागृहातील डिजिटल फलकास 40 हजारांचा खर्च दाखविण्यात आला. हा खर्च कोणत्या नियमानुसार केला व यात महापालिकेचे हित न पाहणार्या संबंधितांवर योग्य ती कारवाई करून प्रकरण फेरसादर करावे, अशी उपसूचना पाटील यांनी मांडली. जीआयएस प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअर खरेदीवर गरमागरम चर्चा झाली.