तर नाट्यचळवळ जीवंत होऊ शकते
By Admin | Published: February 3, 2016 12:28 AM2016-02-03T00:28:56+5:302016-02-03T00:28:56+5:30
शहरातील तरुण कलावंतांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ते त्यांच्या कलेची मोहिनी रसिकांवर टाकू शकतात. परंतु, शहरातील नाट्यगृहाकडे पाहिले तर बालगंधर्व खुले नाट्यगृहात साधा पडदाही नाही. मध्यंतरी या नाट्यगृहाचा कोंडवाडा करून टाकला होता. जिल्हा बॅँकेच्या सभागृहातील खुर्च्यांची दयनीय अवस्था पाहून जीव कासावीस होतो. गंधे सभागृहात रसिक मोठ्या संख्येने बसू शकत नाही. या प्रकरामुळे नाट्यचळवळ संपली असे मनाला वाटते. नवीन नाट्यगृहाबाबत ज्या गंमती-जंमती ऐकायला मिळत आहे. हे नाट्यगृह कधी होईल? याची शाश्वती नाही. परंतु, शहरात जे नाट्यगृह आहे. त्याकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करायला हवी, असे प्रा. डॉ. कुळकर्णी यांनी ठासून सांगितले.
श रातील तरुण कलावंतांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ते त्यांच्या कलेची मोहिनी रसिकांवर टाकू शकतात. परंतु, शहरातील नाट्यगृहाकडे पाहिले तर बालगंधर्व खुले नाट्यगृहात साधा पडदाही नाही. मध्यंतरी या नाट्यगृहाचा कोंडवाडा करून टाकला होता. जिल्हा बॅँकेच्या सभागृहातील खुर्च्यांची दयनीय अवस्था पाहून जीव कासावीस होतो. गंधे सभागृहात रसिक मोठ्या संख्येने बसू शकत नाही. या प्रकरामुळे नाट्यचळवळ संपली असे मनाला वाटते. नवीन नाट्यगृहाबाबत ज्या गंमती-जंमती ऐकायला मिळत आहे. हे नाट्यगृह कधी होईल? याची शाश्वती नाही. परंतु, शहरात जे नाट्यगृह आहे. त्याकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करायला हवी, असे प्रा. डॉ. कुळकर्णी यांनी ठासून सांगितले. कलाकारांना दिला आकार प्रा. हेमंत पाटील म्हणाले, मू. जे. महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग गेल्या १८ वर्षांपासून एकांकिका सादर करत आहे. राज्य नाट्य स्पर्धेसाठी सहभागी कलाकारांना ऊर्जा मिळावी, यासाठी कलाकारांना आकार देण्याचे काम डॉ. कुळकर्णी यांच्यासह आम्ही केले. यासाठी प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत असे विविध विभाग आम्ही तयार केले होते. यात कोणताच विभाग कोणीही ढवळाढवळ करणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली. भूमिका महत्त्वाची ठरली अपूर्वा कुळकर्णी म्हणाली, की नाटकात भूमिका करताना वय महत्त्वाचे ठरते. मात्र, उत्कृष्ट प्रकाश योजना दिल्यामुळे मी या नाटकात बाईची भूमिका यशस्वीरित्या करू शकले. परफेक्ट टिम युनिट ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, की नाटकात सहभागी झाल्यानंतर सर्व तांत्रिक बाजू शिकता आली. शुभम बेलसरे म्हणाला, की आमचा संघ खूपच परफेक्ट होता. नाटकात एकमेकांचे मेकअप आम्ही केले. यश मिळाल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. निखिल कोंघे म्हणाला, की ना. ना. भोळे नाटकाचा प्रयोग माझ्यासाठी मोठा होता.