'डीआरडीओ'मुळे शस्त्रास्त्रात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल :लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 08:35 PM2021-01-09T20:35:18+5:302021-01-09T20:43:04+5:30

एआरडीई, आर अँड डी, एचईएमआरएलला दिली भेट

DRDO moves country towards self-reliance in arms: Army Chief General Manoj Narwane | 'डीआरडीओ'मुळे शस्त्रास्त्रात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल :लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे 

'डीआरडीओ'मुळे शस्त्रास्त्रात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल :लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे 

Next

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्स्थेने (डीआरडीओ) विविश लष्करी तंत्रज्ञान विकसीत करून संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविले आहे. यामुळे येत्या काळात शस्त्रास्त्रांचे परकीय अवलंबत्व कमी होऊन देश पूर्णपणे आत्मनिर्भर होईल, असा विश्वास लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केला.

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. त्यांनी शुक्रवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पुण्यातील तीन प्रयोग शाळांना भेट दिली. तसेच भारत फोर्जला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध लष्करी प्रकल्पांचा आढावा घेतला.

जनरल नरवणे म्हणाले, डीआरडीओच्या पुण्यातील एआरडीई, आर अँन्ड डी, तसेच एचईएमआरएलने अनेक महत्वाची लष्करी उपकरणे बनवली आहे. ही उपकरणे भारतीय सैनिक वापरत आहेत. भविष्यात नव्या युगातील आधुनिक शस्त्रप्रणालीचा या संस्था विकसीत करतील असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एआरडीईमध्ये तयार होत असलेली एटीएजीएस प्रणाली, कृत्रीम पुल, लेझर गायडेड क्षेपणास्त्र प्रणाली, पिनाका रॉकेट लॉन्चर आदींची नरवणे यांनी माहिती घेतली. तर भारत फोर्ज येथे भेट देत   ऐरोस्पेस मैनुफैक्चरिंग कारखाना, अल्ट्रा-लाइट  हॉवित्जर, संरक्षण वाहो, छोटी शस्त्रास्त्रे इत्यादी लष्करी योजनांचा आढावा घेतला. कल्याणी सेंटर ऑफ टेक्निकल एण्ड मैनुफैंक्चरिंग इनोवेशन प्रकल्पाचीही नरवणे यांनी पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी थ्रीडी प्रिंटींग, स्वयंचलीत वाहने तसेच नॅनो तंत्रज्ञान आणि थर्मल इमेजिंग बद्दल माहिती घेतली.

Web Title: DRDO moves country towards self-reliance in arms: Army Chief General Manoj Narwane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.