सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DRDO मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 03:53 PM2020-10-04T15:53:42+5:302020-10-04T15:55:43+5:30
DRDO Recruitment 2020: पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या एकूण १५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
DRDO Recruitment 2020: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. डीआरडीओने सरळ भरती काढली असून, त्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. दरम्यान, ही भरती पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या पदांसाठी होणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. खालील प्रमाणे यासंबंधी माहिती देण्यात आली आहेत...
पदांची नावे व संख्या
पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या एकूण १५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
महत्वाची तारीख
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १४ ऑक्टोबर २०२०
मुलाखतीची तारीख : १३ नोव्हेंबर २०२०
असा करा अर्ज
आपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या https://www.drdo.gov.in/careers या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
कोरोना संकट काळात नोकरीच्या संधी
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.