कर्नाटकमध्ये डीआरडीओचे रुस्तम कोसळले, चाचणीदरम्यान झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:32 AM2019-09-17T10:32:53+5:302019-09-17T11:06:42+5:30
डीआरडीओच्या रुस्तम 2 या यूएव्हीला (मानवरहीत विमानाला) आज सकाळी कर्नाटकमध्ये अपघात झाला.
बंगळुरू - डीआरडीओच्या रुस्तम 2 या यूएव्हीला (मानवरहीत विमानाला) आज सकाळी कर्नाटकमध्ये अपघात झाला. रुस्तमची चाचणी सुरू असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील जोडीचिकेनहल्ली येथे हा अपघात झाला. दरम्यान, डीआरडीओचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत.
चेलकेरे एअरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथे आऊट-डोर परीक्षण केले जाते. डीआरडीओकडून येथे प्रामुख्याने मानवरहीत विमानांबाबत काम होते. दरम्यान, आजचा अपघात हा याच रेंजच्या आसपास झाला आहे.
Karnataka: One TAPAS Experimental Unmanned Aerial Vehicle belonging to Defence Research Development Organization (DRDO) crashed 17 km from Chitradurga test range, today. The UAV was airborne for one of its initial development flights and was undergoing a test when it crashed. pic.twitter.com/IhNJrBkFGu
— ANI (@ANI) September 17, 2019
चित्रदुर्गच्या एसपींनी या अपघाताबाबत सांगितले की, डीआरडीओचे रुस्तम 2 आज सकाळी कोसळले. त्याची चाचणी घेण्यात येत होती. मात्र ती अयशस्वी ठरली आणि हे यूएव्ही मोकळ्या जागेत कोसळले. स्थानिकांनी या यूएव्हीबाबत काही माहिती नव्हती. त्यामुळे अपघातग्रस्त यूएव्ही पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.