क्षणार्धात उडणार शत्रूच्या चिंधड्या, डीआरडीओने केली विध्वंसक अस्त्राची यशस्वी चाचणी
By बाळकृष्ण परब | Published: September 23, 2020 03:13 PM2020-09-23T15:13:16+5:302020-09-23T15:38:22+5:30
लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओला) मोठं यश मिळालं आहे. डीआरडीओने एमबीटी अर्जून रणगाड्यावरून लेझर गाइडेड क्षेपणास्त्राची (एटीजीएम) यशस्वी चाचणी केली आहे.
अहमदनगरमधील केके रेंजमध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या चाचणीबाबत डीआरडीओने सांगितले की, या यशस्वी चाचणीमधून हे क्षेपणास्त्र तीन किलोमीटरपर्यंत असलेल्या लक्ष्याला यशस्वीरीत्या भेदू शकते हे सिद्ध झाले. तसेच हे क्षेपणास्त्र विविध प्लॅटफॉर्मवरून लॉन्च क्षमतेसह विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एमबीटी अर्जुनच्या एका बंदुकीमधून तांत्रिक मूल्यांकनामधून जात आहे.
The missile employs a tandem HEAT warhead to defeat Explosive Reactive Armour (ERA) protected armoured vehicles. It has been developed with multiple-platform launch capability and is currently undergoing technical evaluation trials from a gun of MBT Arjun: DRDO https://t.co/6CqggD8chi
— ANI (@ANI) September 23, 2020
या लेझर गाइडेड क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, अहमदनगरमधील केके रेंज (एसीसी अँड एस) येथे एमबीटी अर्जुनमधून लेझर गाइडेड अँटी टँक गाइडेड क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली. या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओचे अभिनंदन. भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत असेल्या डीआरडीओचा देशाला अभिमान आहे.
DRDO ने गेल्या आठवड्यात हाइपरसोनिक मिसाईलची केली होती चाचणी
भारताने हायपरसोनिक मिसाईल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौछा असा देश बनला आहे ज्याच्याकडे स्वत:चे हाइपरसोनिक तंत्रज्ञान आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनाइजेशन (DRDO) ने गेल्या आठवड्यात ओडिशाच्या बालासोरमध्ये हायपरसोनिक तंत्रज्ञानाच्या डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल HSTDV टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. हे क्षेपणास्त्र हवेत आवाजाच्या ६ पट वेगाने अंतर कापते. म्हणजेच दुष्मनाच्या एअर डिफेन्स सिस्टिमला या क्षेपणास्त्रा चा मागमूसही लागणार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता
आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी