गोव्यात देशी पर्यटकांसाठी ड्रेस कोडची मागणी

By admin | Published: September 3, 2014 01:35 AM2014-09-03T01:35:19+5:302014-09-03T01:35:19+5:30

गोव्यात येणा:या देशी पर्यटकांसाठी किना:यांवर ड्रेस कोड असावा, अशी मागणी सत्ताधारी भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.

Dress code demand for native tourists in Goa | गोव्यात देशी पर्यटकांसाठी ड्रेस कोडची मागणी

गोव्यात देशी पर्यटकांसाठी ड्रेस कोडची मागणी

Next
पणजी : गोव्यात येणा:या देशी पर्यटकांसाठी किना:यांवर ड्रेस कोड असावा, अशी मागणी सत्ताधारी भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.  अनेक देशी पर्यटक पोहण्यासाठी किना:यावर उतरतात, मात्र त्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसतात. त्यांना पोहण्यास आवश्यक असलेले कपडे सक्तीचे करायला हवेत, असे लोबो यांनी म्हटले आहे. 
देशी पर्यटक हॉटेमध्ये न थांबता किना:यांवरच राहतात. त्यांच्याकडील वाहनांमुळे किनारे भरून जातात. अनेकदा हे तरुण विदेशी व्यक्तींसोबत बळजबरीने छायाचित्रे काढतात. या उपद्रवी पर्यटकांवर नियंत्रण असायला हवे अन्यथा गोव्यात पर्यटक येणो बंद होईल, अशी भीती लोबो यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी) 

 

Web Title: Dress code demand for native tourists in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.