हातात बंदूक, खांद्यावर खाट; गर्भवती महिलेला जवानानं पोहोचवलं रुग्णालयात, लोक म्हणाले, हा तर Real Hero
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 05:41 PM2022-04-21T17:41:29+5:302022-04-21T17:42:15+5:30
एका सर्च ऑपरेशनदरम्यान प्रसूती वेदना होत असलेल्या गर्भवती महिलेल्या डिआरजीच्या जवानानं खाटेवर ठेवून पोहोचवलं रुग्णालयात. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड फोर्सच्या जवानांनी मानवतेचं दर्शन घडवून दिलं आहे. दंतेवाडा (Dantewada) येथे शोध मोहिमेदरम्यान, प्रसूती वेदना होत असलेल्या एका गर्भवती महिलेला डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्सच्या (DRG) जवानाने खाटेवर उचलून रुग्णालयात नेले. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण जवानाचं कौतुक करत आहेत.
या ठिकाणी तैनात असलेले जवान कायमच लोकांची मदत करत असतात. आता असंच एक प्रकरण दंतेवाडातील गाव रेवाली येथून समोर आलं आहे. या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असलेल्या डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्सच्या जवानानं गर्भवती महिलेलं खाटेवरून रुग्णालयात पोहोचवलं. दरम्यान, नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यात अडथळे निर्माण केले होते. यादरम्यान महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. परंतु रस्त्यांमध्ये अडथळे असल्याकारणानं रुग्णवाहिकेला पोहोचणं शक्य नसल्याचं तिच्या पतीला सांगण्यात आलं.
#WATCH A jawan of the District Reserve Guard force along with locals carried a pregnant woman on a cot to help her reach the hospital in Dantewada, Chhattisgarh
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 20, 2022
The woman and her newborn baby are in good health, said IG Bastar P Sundarraj pic.twitter.com/erQJyEMT8G
यानंतर जवानांनी खाटेलाच स्ट्रेचरचं रुप दिलं आणि जवळपास ३ किलोमीटर लांबपर्यंत पोहोचवलं. या ठिकाणी डीआरजीचं वाहन थांबवण्यात आलं होतं. त्यातून महिलेला ९० किमी लांब पलनार येथे रुग्णालयात नेण्यात आलं. आता बाळ आणि महिला दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. दरम्यान नेटकऱ्यांनही जवनाचं कौतुक करत याला रिअल हिरो असं म्हटलं आहे.