मिठाच्या नावाखाली इराणमधून ५०० कोटींचे ड्रग्ज आयात; DRI ची गुजरातेत मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 09:04 AM2022-05-27T09:04:12+5:302022-05-27T09:04:50+5:30

गत वर्षांत महसूल गुप्तचर विभागाने देशभरात कारवाई करत ३२१ किलो ड्रग्ज जप्त केले होते.

dri seizes 52 kg cocaine worth over rs 500 crore under operation namkeen in gujarat | मिठाच्या नावाखाली इराणमधून ५०० कोटींचे ड्रग्ज आयात; DRI ची गुजरातेत मोठी कारवाई

मिठाच्या नावाखाली इराणमधून ५०० कोटींचे ड्रग्ज आयात; DRI ची गुजरातेत मोठी कारवाई

googlenewsNext

अहमदाबाद: महसूल गुप्तचर विभागाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. विशेष मीठ असल्याचे सांगत इराणमधून गुजरातमध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांच्या कोकेन ड्रग्जची आयात करण्यात आली. ज्या मालवाहू जहाजावरून कोकेन जप्त करण्यात आले त्यात २५ मेट्रिक टनाच्या १००० मिठाच्या बॅग्ज आहेत, असा दावा करण्यात आला होता. मात्र, डीआरआयने २४ ते २६ मे या काळात केलेल्या तपासणीत मालवाहू जहाजात ५२ किलो कोकेन सापडले, अशी माहिती मिळाली आहे. 

महसूल गुप्तचर विभागाने या मालवाहू जहाजातील मिठाच्या बॅग तपासत असताना काही बॅगमध्ये एका वेगळ्या वासाचा पदार्थ असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर या पदार्थाची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. तपासणीत या पदार्थांमध्ये कोकेनची मात्रा असल्याचे समोर आले. यानंतर केलेल्या जप्तीच्या कारवाईत आतापर्यंत ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त झाले आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, २०२१-२२ मध्ये महसूल गुप्तचर विभागाने देशभरात कारवाई करत ३२१ किलो कोकेन जप्त केले होते. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३ हजार २०० कोटी रुपये होती. मागील एक महिन्यात डीआरआयने काही महत्त्वाचे गुन्हे दाखल केले आहेत. यात कांडला बंदरावर जिप्सम पावडरची आयात करताना २०५ किलो हेरॉईन ड्रग्जची तस्करी, पिपावाव बंदरावर ३९५ किलो हेरॉईन, दिल्ली विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये ६२ किलो हेरॉईन, लक्षद्वीप बेटाच्या किनाऱ्यावर २१८ किलो हेरॉईनचा समावेश आहे.
 

Web Title: dri seizes 52 kg cocaine worth over rs 500 crore under operation namkeen in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.