दारू पिणे पाप
By admin | Published: March 14, 2017 12:34 AM2017-03-14T00:34:18+5:302017-03-14T00:34:18+5:30
दारू आरोग्यासाठी घातक आहे. याकडे सर्वच दुर्लक्ष करतात; पण एक गाव असे आहे ज्या गावात दारू पिणे तर सोडाच, पण दारूचे नाव घेणे देखील पाप समजले जाते.
प्रतापगड : दारू आरोग्यासाठी घातक आहे. याकडे सर्वच दुर्लक्ष करतात; पण एक गाव असे आहे ज्या गावात दारू पिणे तर सोडाच, पण दारूचे नाव घेणे देखील पाप समजले जाते.
प्रतापगड (उत्तर प्रदेश) शहरापासून दहा कि.मी. अंतरावर टांडा नावाचे एक गाव आहे. या गावची लोकसंख्या फक्त २००० हजार आहे. या गावाने राज्यात वेगळी अशी ओळख ीनर्माण केली आहे.
येथे दारू विकली किंवा घेतलीही जात नाही. जर का एखादा विकताना किंवा पीत असताना सापडला, तर काही खरं नाही. अशा व्यक्तींकडून दहा हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंड घेतला जातो. हा निर्णय जरी २० वर्षांपूर्वी पाच पंचांनी मिळून घेतला असला तरी दारूबंदीचा निर्णय हा पूर्वांपार चालत आलेला आहे.