वर्गात केले मद्यपान; ४ विद्यार्थिनी बडतर्फ
By Admin | Published: November 26, 2015 12:13 AM2015-11-26T00:13:14+5:302015-11-26T00:13:14+5:30
तामिळनाडू येथील मुलींच्या उच्च माध्यमिक शाळेत गेल्या आठवड्यात विद्यार्थिनींनी वर्गातच मद्यपान करून दारूच्या नशेत परीक्षा दिल्याचे उघड झाल्यानंतर
नमक्कल (तामिळनाडू) : तामिळनाडू सरकारच्या तिरुचेनगोड येथील मुलींच्या उच्च माध्यमिक शाळेत गेल्या आठवड्यात काही विद्यार्थिनींनी वर्गातच मद्यपान करून दारूच्या नशेत परीक्षा दिल्याचे उघड झाल्यानंतर इयत्ता ११ वीच्या एकूण सात विद्यार्थिनींना शाळेतून बडतर्फ करण्यात आले.
जिल्हा शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार चार विद्यार्थिनींना वर्गात दारू पिऊन परीक्षा दिल्याबद्दल आणि आणखी तीन विद्यार्थिनींना याची माहिती असूनही ती शिक्षकांना न दिल्याबद्दल शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.
इंग्रजी व तामिळ माध्यमाचे इयत्ता सहावी ते १२ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या या सरकारी शाळेत २,५०० हून अधिक मुली शिक्षण घेतात. गेल्या शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. त्यानंतर दोन दिवस चौकशी झाल्यानंतर या सात विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडे त्यांचे दाखले सुपूर्द करण्यात आले.
आधीच्या वेळापत्रकानुसार परीक्षा १६ नोव्हेंबर रोजी व्हायची होती; परंतु मुसळधार पावसामुळे शहरात पाणी घुसल्याने परीक्षा पुढे ढकलून ती २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. त्या दिवशी इयत्ता ११ वीच्या कॉम्प्युटर सायन्स, विज्ञान आणि बिझनेस मॅथेमॅटिक्स या विषयांची परीक्षा व्हायची होती.
उपलब्ध माहितीनुसार परीक्षा स. ९.३० ची होती व मुली स. ८.३० पासून वर्गांत जमू लागल्या. शिक्षक मंडळींपैकी कोणीच त्यावेळी आलेले नव्हते. तेव्हा काही विद्यार्थिनींनी वर्गातच शीतपेयाच्या बाटल्यांमध्ये मिसळून मद्यप्राशन सुरू केले. काही मुलींनी दारू पिऊन उलट्या केल्या, काही बेशुद्ध झाल्या तर काहींनी दारूच्या नशेतच परीक्षा दिली.
परीक्षेच्या पर्यवेक्षकांना वर्गात आल्यावर झाला प्रकार लक्षात आला व त्यांनी मुख्याध्यापिका कृष्णवेणी यांना माहिती दिली. त्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांचे प्रताप त्यांच्या कानावर घातले. (वृत्तसंस्था)
प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांमधील दारूचे व्यसन ही घोर चिंतेची बाब असून जिल्ह्यात घडलेली अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. गेल्या वर्षी तिरुचेनगोड येथील मुलांच्या सरकारी माध्यमिक शाळेतील इयत्ता सहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी नशापान करून शाळेच्या गॅदरिंगच्या वेळी गोंधळ घातल्याने त्यांना बडतर्फ केले गेले होत