पिण्याचं सोडा, आंघोळीच्या योग्यही नाही गंगेचं पाणी

By admin | Published: May 18, 2017 12:28 PM2017-05-18T12:28:11+5:302017-05-18T12:28:11+5:30

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितलं आहे की, हरिद्वारमध्ये गंगेचं पाणी आंघोळीसाठीही योग्य नाही

Drinking water, not suitable for bathing, Ganga water | पिण्याचं सोडा, आंघोळीच्या योग्यही नाही गंगेचं पाणी

पिण्याचं सोडा, आंघोळीच्या योग्यही नाही गंगेचं पाणी

Next
>ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 18 - गंगेत आंघोळ केल्याने तुमचं पाप धुतलं जातं की नाही हे सांगणं कठीण आहे, पण या पाण्यामुळे तुम्ही आजारी पडाल एवढं मात्र नक्की. हरिद्वारला गेल्यानंतर गंगेत डुबकी मारल्यानंतर कदातिच तुम्हाला चांगलं वाटेल, मात्र हे पानी इतकं प्रदूषित आहे की प्यायचं सोडा, साधं आंघोळीच्या योग्यही नाही आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितलं आहे की, हरिद्वारमध्ये गंगेचं पाणी आंघोळीसाठीही योग्य नाही. 
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार गंगेचं पाणी सर्व दृष्टीने असुरक्षित आहे. अधिकृत आकडेवारीनुार हरिद्वार किनारी असलेल्या 20 घाटांवर रोज तब्बल 50 हजार ते एक लाख भक्त गंगेत डुबकी घेत स्नान करत असतात. 
 
उत्तराखंडमधील गंगोत्रीपासून ते हरिद्वारपर्यंत 11 ठिकाणी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. 294 किमी परिसरातील 11 ठिकाणांची यासाठी निवड करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी चार प्रमुख गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं, ज्यामध्ये तापमान, पाण्यात मिसळलेला ऑक्सिजन, बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) आणि कॉलिफॉर्म (बॅक्टेरिया) यांचा समावेश होता. हरिद्वारजवळील गंगेच्या पाण्यात BOD, कॉलिफॉर्म आणि काही विषारी घटक आढळले आहेत. 
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांनुसार आंघोळीच्या एक लिटर पाण्यात BOD ची क्षमात किमान 3 मिलीग्रामपेक्षा कमी असली पाहिजे. मात्र इथे हा स्तर 6.4 मिलीग्राम आहे. अनेक ठिकाणी कॉलिफॉर्मचं प्रमाणदेखील जास्त आढळलं आहे. जिथे पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 90 एमपीएन (मोस्ट प्रॉबेबल नंबर) असणं अपेक्षित आहे, तिथे हे प्रमाण 1,600 एमपीएन आढळलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार आंघोळीच्या  100 मिमी पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 500 एमपीएनपेक्षा कमी असलं पाहिजे. 
 

Web Title: Drinking water, not suitable for bathing, Ganga water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.