BMW मधून फिरायची, सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करायची; इन्फ्लूएन्सर जसनीतला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 03:45 PM2023-04-05T15:45:15+5:302023-04-05T15:45:59+5:30
इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो पोस्ट करुन जसनीत कौर लोकांना जाळ्यात ओढायची आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करायची.
लुधीयाना-
इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो पोस्ट करुन जसनीत कौर लोकांना जाळ्यात ओढायची आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करायची. स्वत:ला सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर समजणाऱ्या जसनीत कौर हिला लुधियाना पोलिसांनी अटक केली आहे. आपले अश्लील फोटो पाठवून आधी समोरच्याचं मन जिंकायचं आणि मग त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं. पुढे मग ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची. तसंच पैसे न दिल्यास गँगस्टरकरवी धमकी देखील द्यायची.
जसनीत महागड्या बीएमडब्ल्यू कारमधून फिरायची. पोलिसांनी तिला मोहालीतून अटक केली आहे आणि तिची चौकशी सध्या सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जसनीतचे एका राजकीय पक्षाशी संबंध आहेत. तिचा एक मित्र राजकीय पक्षाशी जोडलेला असून तोच तिला या कामात मदत करत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस सध्या त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
दोन दिवसांच्या कोठडीत जसनीत हिची कसून चौकशी केली जाणार आहे. यात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. तसंच पोलीस तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटची देखील तपासणी करत आहेत. जेणेकरुन आणखी कुणाकुणासोबत ब्लकमेलींग केलं गेलंय याची माहिती मिळू शकेल.
जसनीत कौर विरोधात एफआयआर दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, जसनीत कौर संगरुर येथील रहिवासी आहे. तिचे वडीलांचं निधन झालं आहे. पैसे कमावण्यासाठी तिनं इन्स्टाग्रामवर अश्लील रिल्स बनवण्यास सुरुवात केली. मग हळूहळू फॉलोअर्स वाढू लागले आणि पुढे जाऊन ती ब्लॅकमेलिंगच्या चुकीच्या मार्गाला लागली. तिच्या जवळ ७५ लाख रुपये किमतीची BMW कार असल्याचीही माहिती समोर आली आहे. जसनीत हिनं आतापर्यंत किती जणांना फसवलं आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
अश्लील व्हिडिओ अन् फोटोंमुळे प्रसिद्ध झाली जसनीत कौर
जसनीत कौर तिच्या अश्लील व्हिडिओ आणि फोटोंमुळेच चर्चेत आली. त्यानंतर तिनं लुधियानाचा व्यावसायिक गुरबीर याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला ब्लॅकमेल करण्यासही सुरुवात केली. याच दरम्यान तिनं व्यापाऱ्याकडे १ कोटी रुपये खंडणी मागितली. गुरबीर यानं याप्रकरणी मोहाली येथे तक्रार दाखल केली होती.
मोहाली येथून केली गेली अटक
खंडणीचे पैसे दिले गेले नाहीत तर गुरबीर याला गँगस्टर्सकडून धमकी देण्याचाही प्रताप तिनं केला होता. गुरबीर लुधियानानं मॉडल टाउन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत जसनीत हिला अटक केली.