‘त्या’ लोकांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर राबवा; राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:47 AM2020-04-02T00:47:53+5:302020-04-02T06:34:38+5:30
धार्मिक परिषदेत सहभागी झालेल्या लोकांमुळे भारतात कोविड-१९ च्या प्रसाराची जोखीम वाढली आहे, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध युद्धपातळीवर घ्यावा.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रसार टाळण्यासाठी े दिल्लीतील निजामुद्दीन येथील या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध घेणे आणि त्यांची ओळख निश्चित करून त्यांच्यावर बारकाईने निगराणी ठेवण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू करावी, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव राजीव गौबा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची बैठक घेऊन या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांविरुद्ध व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. या धार्मिक परिषदेत सहभागी झालेल्या लोकांमुळे भारतात कोविड-१९ च्या प्रसाराची जोखीम वाढली आहे, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध युद्धपातळीवर घ्यावा.
27500 कोटी रुपये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतहत केंद्र सरकार बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वाटप करणार आहे. राजीव गौबा यांनी सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पुढच्या आठवडाभरात ही योजना अमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.
सामाजिक दूरस्त राखण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा केली जाणार आहे. देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.