नशीब असावं तर असं! रातोरात करोडपती झाला ड्रायव्हर; 49 रुपयांत मालामाल; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:02 PM2023-04-11T15:02:58+5:302023-04-11T15:04:50+5:30

एका ड्रायव्हरचं नशीब एका रात्रीत फळफळलं आहे. ही व्यक्ती एका झटक्यात करोडपती झाली.

driver online gaming app won prize of 1 crores by investing rs 49 only | नशीब असावं तर असं! रातोरात करोडपती झाला ड्रायव्हर; 49 रुपयांत मालामाल; नेमकं काय घडलं?

फोटो - झी न्यूज

googlenewsNext

मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील एका ड्रायव्हरचं नशीब एका रात्रीत फळफळलं आहे. ही व्यक्ती एका झटक्यात करोडपती झाली. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहे. ड्रायव्हरलाही माहीत नव्हते की एक दिवस तो इतका मोठा माणूस होईल. मिळालेल्या माहितीनुसार, बरवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील झोपडपट्टी भागातील रहिवासी शाहबुद्दीनने आयपीएलमधील कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन गेमिंग एपवर केवळ 49 रुपये लावले होते. 

ऑनलाईन एपवर लावलेल्या टीमने चांगली कामगिरी केली, ज्यामुळे त्याला 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. शाहाबुद्दीन हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे. करोडो रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. शाहबुद्दीन मन्सुरी यांनी पारितोषिक पटकावल्यानंतर कुटुंबातील सदस्य तसेच मित्रपरिवार व नातेवाईकांकडून अभिनंदन करण्यात येत असल्याचे सांगितले. स्वतःचे घर बांधणार आणि नंतर काहीतरी व्यवसाय करणार असल्याचंही म्हटलं आहे. 

शाहबुद्दीन मन्सूरी म्हणाले की, गेली दोन वर्षे मी अशा ऑनलाईन क्रिकेट खेळांमध्ये संघ तयार करून आपले नशीब आजमावत आहे. 2 एप्रिल रोजी कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान त्याने एपवर एक क्रिकेट टीम बनवली. शाहबुद्दीनयांनी 49 रुपये इंट्री फीसच्या कॅटेगिरीमध्ये टीम तयार करून प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या तरुणांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

शाहबुद्दीनने त्याच्या एप वॉलेटमधून जिंकलेल्या दीड कोटी रुपयांपैकी 20 लाख रुपयेही काढले आहेत. मात्र, यातून 6 लाख रुपये कर वजा करण्यात आले. यानंतर त्यांच्या बँक खात्यात 14 लाख रुपये जमा करण्यात आले. बडवानी येथील सेंधवा येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या शाहबुद्दीनने जिंकलेल्या पैशातून स्वत:चे घर बांधण्याची योजना आखली आहे. उरलेल्या रकमेतून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचाही त्यांचा विचार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: driver online gaming app won prize of 1 crores by investing rs 49 only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.